Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात. महिलांकडे तर काही ना काही जुगाड असतातच, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी चुटकीशीर होऊन जातात. अशाच एका सासऱ्यांनी आपल्या जावयाची हॅलिकॉप्टरमधून एन्ट्री घेण्याची इच्छा होती पण त्यांचं तेवढं बजेट नव्हतं पणतरीही त्यांनी की कशी पूर्ण केली बघाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ हा जणू काही एक विधीच असायचा. म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागडया वस्तूसाठी अडून बसत असे. एवढंच काय तर अमूकच एक कोल्ड्रिंक प्यायला हवं म्हणूनही अडून बसलेल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत किंवा अनुभवल्या आहेत.आपल्या घरातल्या आजीकडून अशा अनेक लग्नांच्या कहाण्या ऐकायला मिळतील. खरं तर अडवणूक करण्याच्या या सा-या गोष्टी पूर्वनियोजित असत. तेव्हाचा काळ अगदीच वेगळा होता.

दरम्यान अशाच एका नवरदेवानं हॅलिकॉप्टरमधून एन्ट्रीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सासऱ्याचं तेवढं बजेट नव्हतं, पण जावयाला नाराज करुनही चालणार नाही. मग काय सासऱ्यांनी असा जुगाड केला की जावईही खूश आणि बजेटमध्ये काम झालं. आता तुम्ही म्हणाल त्यांनी असं केलं तरी काय? तर त्यांनी थेट कारला हॅलिकॉप्टरसारखं बनवलं आणि त्यातून नवरदेवाची एन्ट्री घेतली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ marathi_memer_2.0 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, असंच पाहिजे नवरदेवाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.