सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, यातील काही व्हिडिओ आपणाला पोट धरुन हसायला लावणारे असतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. शिवाय असे अनेक लोक असतात जे स्टंट करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पण असे धोकादायक स्टंट करणं किती महागात पडू शकतं, याचं उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कारमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर डोकं काढल्यामुळे एका मुलाचा भीषण अपघात झाला आहे.
मुलाच्या भयानक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा कारमध्ये मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, मुलगा कारच्या आतमधील प्लास्टिकचे ‘लॉकर’ पकडतो आणि खिडकीतून बाहेर डोकं काढतो आणि मस्ती करतो. यावेळी त्याचा व्हिडीओ शूट करणाऱ्या सहकाऱ्याकडे बघत तो हसतानाही दिसत आहे. पण यावेळीच कारच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला त्याने धरलेले प्लास्टिकचे लॉकर तुटते आणि क्षणात तो भरधाव कारमधून रस्त्यावर पडतो. शिवाय या कारच्या स्पीडमुळे त्या मुलाला किती गंभीर जखम झाली असेल याचा अंदाजही तुम्ही व्हिडिओ पाहून लावू शकता. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेणं किती आवश्यक आहे व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी कारच्या हँडलच्या मजबुतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत तर कोणी मुलाच्या नको त्या चुकीमुळे अपघात झाल्याचं म्हटलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओ शूट करण्याच्या नादाच स्वताचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन देखील केलं आहे.