सध्या सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचा पती आलोक यांच्यातील वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय या दोघांमधील वादाशी संबंधित सतत नवनवीन खुलासे होत आहेत. काही लोक ज्योती यांनी पतीला धोका दिल्याचं म्हटलं आहेत. तर ज्योती यांनी वादाच्या आधीच आमची न्यायालयीन लढाई सुरु होती असं म्हटलं आहे. मात्र,या घटनेमुळे लग्नानंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ज्योतीच्या कृत्यामुळे अनेक पती आपल्या पत्नीला पुढे शिक्षण घेण्यापासून थांबवत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता बिहारमधील बक्सर येथील असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये पतीने पत्नीला पुढे शिकवण्यास नकार दिला आहे.

ज्योती मौर्य प्रकरणामुळे घाबरला नवरा –

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
fraud with woman doctor karad , karad ,
सातारा : सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला गंडा
police wife affair loksatta news
पोलीस हवालदाराने पत्नीच्या प्रियकराच्या गाडीत ठेवले काडतूस; पण झाले उलटेच…

बिहारमधील बक्सर येथील एका पत्नीने पतीवर आरोप केला आहे की, एसडीएम ज्योती मौर्य यांच्या घटनेला घाबरून पती तिला पुढे शिकवण्यास नकार देत आहे. शिवाय पत्नीला शिकवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगत त्याने तिला पुढे शिकवण्यास नकार दिला्याचंही पत्नीने सांगितलं आहे. घटनेतील महिला बीपीएससीची तयारी करत असून लग्नानंतर नवऱ्याने तिला शिक्षणासाठी मदत केली होती, पण आता तो तिला पुढे शिकविण्यास नकार देत आहे.

महिलेने गाठले पोलीस स्टेशन –

नवऱ्याने शिक्षणाला नकार देताच, पत्नी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. महिलेची तक्रार ऐकून काही वेळ पोलिसही गोंधळले. तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना सांगितलं की, तिला पुढे शिक्षण घ्यायचे असून यासाठी तिला पोलिसांनी मदत करावी. या घटनेतील महिलेचा पती पिंटूने सांगितले, “पत्नीला पुढे शिकवण्यासाठी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. शिवाय मी पेट्रोल पंपावर काम करतो, मला ८ ते १० हजार पगार मिळतो, याच पैशातून मी माझ्या पत्नीचे ग्रॅज्युएशन आणि पीजी पूर्ण केले. शिवाय पुढचे शिक्षणही चालू होते, पण आता पुढे शिकवायचे नाही. कारण आलोक मौर्यासोबत जे घडले ते माझ्याबाबतीत घडू न, याची मला भीती वाटत आहे.”

या प्रकरणानंतर पत्नीने सर्व मुली सारख्या नसतात, मला अभ्यास करायचा असून आता पोलिसांनी मला अभ्यासासाठी मदत करावी अशी मागणी महिलेने केली. दरम्यान, पोलिसांनी दोघांना समजावून सांगून परत पाठवले.

Story img Loader