माणसाच्या अधाशीपणामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होतोय. जंगलं नष्ट होत आहेत. प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. पण रवांडामध्ये एक मेलेला गोरिला जिवंत झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या गोरिलाचं नाव आहे ‘कँट्सबी’. आफ्रिकेतल्या ‘माउंटन गोरिला’ या प्रजातीचा कँट्सबी एक फेमस सदस्य आहे. त्याला कारणही आहे. प्रसिध्द प्राणिशास्त्रज्ञ डिअॅन फाॅसी यांनी गोरिलांच्या संवर्धनासाठी रवांडामध्ये ७०-८० च्या दशकात राबवलेल्या प्रकल्पात कँट्सबीचा जन्म झाला होता. गोरिलांचं आयुष्य सुमारे २० वर्षांचं असतं. पण १९७८ मध्ये जन्म झालेला कँट्सबी पस्तिशीत पोचला तरी धडधाकट होता. त्यामुळे जगभरातले पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी आणि संशोधकांचा तो ‘पोस्टर बाॅय’ बनला होता.

हा प्रसिध्द गोरिला आॅक्टोबर महिन्यात अचानक गायब झाला आणि सगळीकडे प्रचंड धावपळ झाली. या ना त्या कारणाने वन्य प्राणी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर असतातच. त्यात कँट्सबीसारखा सेलेब्रिटी असल्यावर बातच सोडा. रवांडा सरकारला जगभरातून फोन आले. कँट्सबी ज्या नॅशनल पार्कमध्ये रहायचा त्या ‘व्हॉल्केनो नॅशनल पार्कमध्ये’ युध्दपातळीवर शोधाशोध सुरू झाली. सॅटेलाईट इमेज वापरून जंगलाचा कानाकोपरा धुंडाळण्यात आला. या पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी डोळ्यात तेल घालून शोधाशोध केली. तसंच गोरिला संवर्धन प्रकल्पातल्या स्वयंसेवकांनीही कसून शोध घेतला . हे ७३ स्वयंसेवक  या नॅशनल पार्कमधल्या  गोरिलांच्या १२ कळपांवर वर्षातले ३६५ दिवस नजर ठेवून असतात. या स्वयंसेवकांनाही कँट्सबी न सापडल्याने शेवटी प्रशासनाने ‘आले देवाजीच्या मना’ केलं. कितीही दीर्घायुषी असला तरी त्याचं जीवन एक ना एक दिवस संपणारच, या विचाराने सगळ्यांचे डोळे पाणावले. कँट्सबी आपल्याला सोडून गेलाय असं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. जगभर प्राणिप्रेमींनी कँट्सबीच्या स्मृतींना वंदन केलं. प्राणिसृष्टीच्या पोस्टर बाॅयला श्रध्दांजली वाहिली गेली.

..आणि ५ जानेवारीला कँट्सबी काही झालंच नाही अशा रूबाबात आपल्या कळपात पुन्हा दाखल झाला. आधुनिक टेक्नाॅलाॅजी वगैरे असणाऱ्या आपल्या सगळयांना आपल्या पूर्वजाने व्यवस्थित चकवल्याचं उघड झालं. पण कँट्सबी गेला तरी कुठे होता? या प्रश्नावर उच्चपदस्थ चर्चा सुरू झाली. कँट्सबी याआधी असा फरार कधीच झाला नव्हता. पण आताच काय झालं? कँट्सबी (पुन्हा) प्रेमात पडल्याने पळून गेल्याचं कोणीतरी पिल्लू सोडलं. पण तसं असतं तर गोरिलांच्या कळपामधली एखादी मादी गोरिलाही बेपत्ता झाली असती. पण तसंही झालं नव्हतं. अरे मग झालं तरी काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनतरी मिळालेलं नाहीये.

युध्दासाठी वापरतात ती टेक्नाॅलाॅजी वापरूनही आपण कँट्सबीला शोधू शकलो नाही. तो त्याच्या मर्जीने गेला, त्याला वाट्टेल तेव्हा आला. काही झालं तरी निसर्गच बाप !