सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओतील घटना अनेकदा जुन्या असतात; पण कधी कधी हे प्रसंग नुकतेच घडले आहेत, असा दावा करण्यात येतो. देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहे. उमेदवारांना निवडून देण्यासाठी कुठे मोर्चे, तर कुठे रॅली, तर मोठमोठी पोस्टर्स रस्त्यांवर लावलेली दिसून येत आहेत. अशातच हरियाणामधून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात हरियाणातील सिरसा येथे माजी खासदार व भाजपाचे उमेदवार अशोक तंवर यांच्या गाडीवर नुकताच हल्ला झाल्याचा दावा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हायरल होणारा हा दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर मनीष कुमार @Manish Kumar advocate यांनी व्हायरल व्हिडीओ त्यांच्या अकाउंटद्वारे शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला ‘भाजपाचे उमेदवार अशोक तंवर यांना सिरसावासीयांनी आजच लोकसभेत पाठवले’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे .
इतर वापरकर्तेदेखील गाडीवर हल्ला झाल्याचा दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
तर आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि व्हिडीओमधून अनेक की-फ्रेम (Key Frame) मिळवून आमचा तपास सुरू केला. पण, रिव्हर्स इमेज सर्चनंही कोणतंही सत्य समोर आलं नाही. म्हणून आम्ही सिरसा कार अटॅक (Sirsa car attacked), असं गूगलवर सर्च केलं. तर हे सर्च करताच आम्हाला २०२१ च्या काही बातम्या दिसून आल्या; ज्यात हरियाणाचे उपसभापती रणवीर सिंग गंगवा यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा उल्लेख दिसून आला. या प्रकरणी हरियाणातील सिरसा पोलिसांनी १०० आंदोलकांवर गुन्हादेखील दाखल केला होता.
https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/haryana-deputy-speaker-cars-attack-incident-sirsa-police-books-over-100-protesters/articleshow/84376638.cms
आम्हाला या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ न्यूज रिपोर्टदेखील मिळाला आहे.
तसेच या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, शेतकऱ्यांनी उपसभापतींच्या वाहनावर दगडफेक केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आम्हाला की-फ्रेमवर ‘पीबी न्यूज’चा वॉटरमार्क आढळला; जेव्हा यूट्युबवर आम्ही याचा शोध घेतला तेव्हा आम्हाला कळले की, ते नाव ‘पहरेदार भारत न्यूज’ आहे.
त्यानंतर आम्ही “पहरेदार भारत न्यूज रणवीर सिंग गंगवा” हा फेसबुक कीवर्ड शोधला. तेव्हा आम्हाला हा व्हिडीओ २३ जून २०२२ रोजी फेसबुकवर अपलोड करण्यात आल्याचे आढळले. तेव्हा या व्हिडीओला हिंदीमध्ये ‘उपसभापती रणवीर गंगवा यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी शेतकऱ्यांची बैठक; आता लवकरच खटले रद्द होतील’, अशी कॅप्शन देण्यात आली होती.
https://www.facebook.com/pahredarbharatnews.sirsa/videos/547247183601224
पुन्हा सोशल मीडियावर हाच व्हिडीओ प्रसारित केला जात आहे.
निष्कर्ष : हरियाणाचे उपसभापती रणवीर गंगवा यांच्या कारवरील हल्ल्याचा जुना व्हिडीओ भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांच्या कारवर हल्ला झाल्याचे सांगून पुन्हा व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावे खोटे आहेत हे स्पष्ट होत आहे.