Viral Video: अनेक भारतीय चाहत्यांसाठी सचिन रमेश तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव आहे. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. सचिन तेंडुलकर आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याचा चाहतावर्ग अजूनही त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. तर याचं उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. सचिन तेंडुलकर विमान प्रवास करत असताना त्याच्या चाहत्यांनी त्याचे हटके स्वागत केलं आहे.
काय आहे व्हिडीओत ?
जेव्हा सचिन तेंडुलकर मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरायचा तेव्हा सर्व चाहते सचिन, सचिन असा जयघोष करायचे. अगदी तसंच या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह विमान प्रवास करीत होता. त्यादरम्यान जेव्हा चाहत्यांना या गोष्टीची चाहूल लागते, तेव्हा सगळे सचिन, सचिन असे ओरडू लागतात आणि टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करतात. सचिन चाहत्यांचे प्रेम पाहून हात जोडून त्यांचे आभार मानतो. एकदा पाहाच हा अनोखा व्हिडीओ.
हेही वाचा…परिस्थिती माणसाला जगायला शिकवते! हेअरबँड विकत चिमुकला करतोय फूटपाथवर अभ्यास; पाहा हृदयस्पर्शी VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सचिनला पाहून विमानातील सर्व चाहते सचिनचे फोटो काढू लागतात आणि त्याचे टाळ्या वाजवत, जयघोष करत अनोखं स्वागत करतात. सचिन तेंडुलकर सध्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानी आग्र्याला भेट दिली होती. त्यानंतर आता तो काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेतो आहे. तसेच पत्नीसह त्याने एका बॅट बनवण्याच्या कारखान्यालासुद्धा भेट दिली आहे. यादरम्यान पर्यटकांना आणि चाहत्यांना त्याने ऑटोग्राफही दिला.
तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ @omgsachin या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘ जेव्हा विमानाचे एका स्टेडिअममध्ये रूपांतर होते’; अशी कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून सचिन तेंडुलकरचे चाहते विविध शब्दांत कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.