Viral Video : शौर्याची मूर्ती असलेले भारतीय सैनिक त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहतात. देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईक, कुटुंब यांच्यापासून दूर राहतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढतात. खरं तर त्यांचे आभार मानाने तितके कमी आहे. भारतीय सैन्याचे कुटुंबाला सुद्धा खूप मोठा त्याग करावा लागतो. सेन्याचे आई वडील, पत्नी, मुले त्यांच्या आठवणीत प्रत्येक दिवस जगतात. जेव्हा सैनिक घरी येतो तेव्हा त्यांच्या घरी दसरा दिवाळी साजरी केली जाते. सेवानिवृत्त होऊन सैनिक जेव्हा सुखरुप घरी येतो, तो दिवस त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात भावनिक दिवस असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये २१ वर्ष भारतमातेची सेवा करुन सैनिक सुखरूप घरी परतेला दिसत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. घरी परतलेल्या पतीला पाहून सैनिकाच्या पत्नीचे अश्रु थांबत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भारतीय सैन्य पत्नीचा हात धरुन घरात प्रवेश करत आहे. त्याच्या मागे घरातील अन्य सदस्य सुद्धा आहे. भारतीय सैन्याच्या कपाळावर लाल टिळा आणि गळ्यात फुलांच्या माळा आहेत. त्याचे जल्लोषात स्वागत केलेले दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पत्नीचे अश्रु थांबत नाही. पतीला घरी पाहून तिचे आनंदाश्रू वाहत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल सैनिक पायातील शूज काढून देवघरात जातो आणि पत्नीसह देवासमोर हात जोडतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा : भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

pravin_maharaj_shelar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “२१ वर्ष भारतमातेची सेवा करुण पती श्री पंकज सुखरूप घरी आल्यावर माझी लाडकी बहिन सौ लताचे आनंदाश्रू”

हेही वाचा : ‘गुलाबी साडी’नंतर ‘काली बिंदी’ गाण्याची परदेशातही हवा; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पॉंडचा जबरदस्त डान्स, Video पाहून युजर्स करतायत कौतुक

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक फौजी जेव्हा सेवा निवृत्त होऊन घरी परत येतो तेव्हा त्याचा तो दूसरा जन्म झालेला असतो” तर एका युजरने लिहिलेय, “येवढ्या दिवसाचा खरा प्रवास ताईचे डोळे सर्व काही सांगून जातो, एका फौजीच्या पत्नीच खरं जीवन तेव्हाच सुरू होत की जेव्हा आपला पती देशाची सेवा करून सुखरूप परत आपल्या घरी येतो तेव्हा खूप खूप शुभेच्छा दादा आणि ताई. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी सुखी संसारासाठी. दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे की एक मराठा वाघ देशाची सेवा करून सुखरूप परत आल्याचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकाच्या कुटुंबाला असे सुख मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना”

पाहा व्हायरल व्हिडीओ

याच इन्स्टाग्राम अकाउंटवरून आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या सैनिकाचे सर्व कुटुंब भावुक होऊन रडताना दिसत आहे.

Story img Loader