Viral Video : शौर्याची मूर्ती असलेले भारतीय सैनिक त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहतात. देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईक, कुटुंब यांच्यापासून दूर राहतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढतात. खरं तर त्यांचे आभार मानाने तितके कमी आहे. भारतीय सैन्याचे कुटुंबाला सुद्धा खूप मोठा त्याग करावा लागतो. सेन्याचे आई वडील, पत्नी, मुले त्यांच्या आठवणीत प्रत्येक दिवस जगतात. जेव्हा सैनिक घरी येतो तेव्हा त्यांच्या घरी दसरा दिवाळी साजरी केली जाते. सेवानिवृत्त होऊन सैनिक जेव्हा सुखरुप घरी येतो, तो दिवस त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात भावनिक दिवस असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये २१ वर्ष भारतमातेची सेवा करुन सैनिक सुखरूप घरी परतेला दिसत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. घरी परतलेल्या पतीला पाहून सैनिकाच्या पत्नीचे अश्रु थांबत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा