दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर #TheKashmirFiles ट्रेंड होत आहे. अगदी सामान्य प्रेक्षक, समीक्षक यांच्यापासून ते थेट बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुरुवातीला हा सिनेमा फक्त ७०० स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. पण जबरदस्त यश पाहून तो २००० स्क्रीन्सवर रिलीज झाला.
१९९० मध्ये खोर्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित चित्रपटाची चर्चा होत असताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं जुनं ट्वीट आणि एक फोटो व्हायरल होत आहे. हे ट्विट १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये करण्यात आले होते. यात विवेक अग्निहोत्री जामा मशिदीसमोर नमाज पढताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जामा मशिदीत’ यासोबतच त्यांनी #Freedom देखील लिहिले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी थिएटरमध्ये आला आणि कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.