मगरी हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. पाण्यात सिंह, हत्ती यांसारख्या प्राण्यांशी पंगा घ्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत. मगरीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती पाण्याबाहेरही जमिनीवर भक्ष्य पकडू शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सिंहाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये शिकारी असलेला सिंहच मगरींचा शिकार होणार असल्याचे दिसत आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून नेहमीच क्रुर आणि भितीदायक वाटणाऱ्या या सिंहाची तुम्हालाही दया येऊ लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंह शिकारीसाठी गेला पाण्यात
आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकणाऱ्या सिंहाची नजर पाण्यात भक्ष्यावर पडल्याचे या व्हिडीओवरुन कळते. सिंहानेही क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारली आणि शिकाराजवळ पोहोचला. जवळ गेल्यावर त्याला लगेच कळले की, मोठा प्राणी आधीच मेला होता. आता सिंह त्याला आपले भक्ष्य बनवण्याआधीच काही सेकंदात मगरींचा कळप त्याच्याभोवती आला. त्यामुळे सिंहाच्या हातातून संधी गेली होती, पण काही क्षणात त्याला हे लक्षात आलं की, आता तो कोणाचा तरी भक्ष्य होणार आहे. कारण या सिंहाला मगरीच्या कळपाने चारही बाजून वेढलं होतं आणि त्या आता सिंहाला भक्ष्य बनवण्याच्या तयारीत होत्या. या प्रकरणानंतर सिंह आपले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागला.

(आणखी वाचा : Cursed Chair: आजवर जो ‘या’ खुर्चीवर बसला तो संपला; जाणून घ्या शापित खुर्चीची गोष्ट )

सिंह मगरींपासून वाचू शकणार का?
मोठ्या संख्येने धोकादायक जलभक्षक पाहून सिंह ताबडतोब मृत प्राण्याच्या वर चढला आणि मगरी त्याच्याभोवती घिरट्या घालू लागल्या. अशा स्थितीत इतक्या मगरींच्या जबड्यातून सिंह निसटणार का? हे पाहून कोणीही सहज उत्तर देईल ‘अशक्य’. तुम्हीही असाच विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. किंबहुना इतक्या मगरींसमोर सिंहाने हार न मानता खाली उतरल्यावरच पाण्यावर उडी मारुन तेथून पळ काढण्याचा रस्ता काढलाच.

मगरी आणि सिंहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. प्राणी_पॉवर्सच्या पेजवरून इन्स्टाग्रामवरही तो अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाईक देखील केला आहे.

सिंहाने हिंमत दाखवली आणि तोंड उघडून मगरींवर उडी मारली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डझनभर मगरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत राहिल्या, पण नशीब जंगलाच्या राजाकडेच राहिले. सुरक्षित पाण्यातून बाहेर पडून तो जमिनीवर पोहोचला. व्हिडीओमधला हा एक सीन आहे जो कोणालाही आश्चर्यचकित करेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The king of the forest who went hunting got caught in the clutches of a crocodile he will never forget what happened next in his life pdb