गावक-यांनी आणि वनविभागाने कालव्यात उडकलेल्या १८ फूट लांब मगरीला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले आहे. श्रीलंकेतला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. श्रीलंकेतल्या मातारा येथील एका कालव्यात मगर अडकली होती. पाण्याचा प्रवाह आणि अजस्त्र शरीर यामुळे या मगरीला कालव्यातून बाहेर येण्यास अडचण येत होती. अखेर गावकरी आणि वनविभागाच्या काही अधिका-यांनी क्रेनच्या साह्याने या मगरीची सुटका करत तिला सुखरुप बाहेर काढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अन्नाच्या शोधात जवळपास १५०० किलो वजन असलेली मगर कालव्यात आली होती. पण अजस्त्र आकारामुळे या मगरीला मात्र कालव्यातून बाहेर निघता येईना. त्यामुळे ती तिथेच अडकून होती. पाण्याच्या प्रवाहामुळे या मगरीच्या जीवाला धोका होता त्यामुळे गावक-यांनी त्वरीत याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने क्रेनच्या साह्याने या मगरीला कालव्यातून बाहेर काढून सुखरुप नदीत सोडले आहे. आतापर्यंत एवढी मोठी मगर गाव-यांनी पाहिली नव्हती त्यामुळे तिला पाहण्यासाठी गावक-यांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. ‘लाईव्ह लीक’ या युट्युब चॅनेलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत श्रीलंकेत आढळलेली ही सगळ्यात मोठी मगर आहे.