Lion Viral Video: प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी आपली तहान आणि भूक भागवणं खूप महत्त्वाचं आहे. माणसांप्रमाणेच प्राण्यांनादेखील आपली भूक भागविण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहतो. ज्याप्रकारे आपण जगण्यासाठी आणि भौतिक सुख मिळवण्यासाठी काही ना काही कष्ट करत असतो, त्याचप्रमाणे जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक शमविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतात. जंगलातील हे धडकी भरवणारे व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह चित्याची शिकार करताना दिसत आहे.
जंगलातील हिंस्र प्राण्यांची नावं घ्यायची झाल्यास वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता यांसारख्या काही प्राण्यांची नावं समोर येतात. हे प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर तसेच मानवी वस्तीतही शिरकाव करून हल्ला करताना दिसून येतात. आता एका सिंहाचा असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सिंहाचा धडकी भरवणारा व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सिंहाची चित्त्यावर नजर पडताच तो त्याचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या मागे धावतो, यावेळी सिंह वाऱ्याच्या वेगाने धावून चित्त्यावर हल्ला करतो. अखेर चित्ता त्याच्या तावडीत सापडतो आणि सिंह त्याचे भक्षण करतो. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @top_tier_wilderness या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये ‘सिंह अनेक कारणांमुळे इतर हिंस्त्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी ओळखले जातात, त्याच्यातील मुख्य कारण म्हणजे प्रादेशिक वाद’ असे लिहिले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलेय, “पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राण्यांपैकी एक चित्ता, परंतु सिंह त्याला पकडतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सिंह वेगवान धावणार आणि तो खूप भयानक आहे.”, तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “दु:खद; पण तो जलद मृत्यू होता, शेवटी हा निसर्गाचा नियम आहे.”