Viral video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चिमकला सिंहाच्या तावडीत सापडला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज हास्याने भरलेले असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लहान मुलं कधी निरागस तर कधी खोडकर असतात. अशा मुलांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात जे लोकांना पाहायला देखील आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका चिमुकल्याला सिंहानं पकडलं आहे. चिमुकल्याचं टि-शर्ट सिंहानं त्याच्या पंजामध्ये पकडलं आहे. आता तुम्हाला या चिमुकल्याची दया येईल पण हा चिमुकला सिंहानं पकडलं म्हणून अजिबात घाबरला नाहीये तर त्याचं टि-शर्ट फाटेल म्हणून रडत आहे. तो चक्क सिंहाला विनवणी करत आहे की “सोड रे माझं शर्ट फाटेल मला माझी आई मारेल, जर माझं टी-शर्ट फाटलं माझी आई माझा चकना-चूर करू टाकेल प्लिज मला सोड” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.  हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या लहानपणीचे दिवस आठवतील.

सिंह म्हंटलं की सगळ्यांनाच धडकी भरते मात्र हा चिमुकला अजिबात घाबरलेला दिसत नाहीये. फक्त माझं टी-शर्ट सोड एवढच तो सांगत आहे. त्याचा हा निरागसपणा पाहून तुम्हालाही हसू येईल.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही नक्कीच आपलं हसू आवरता येत नसणार. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. marathi_news0 नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर ते शेअर करण्यात आले आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. नेटकरीतर या मुलाचे आणि त्याच्या शैलीचे फॅन झाले आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत म्हंटलंय, “आईचा धाक”

Story img Loader