भुकेल्या वाघाला मूर्ख बनवणारे बदक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होणार हा १० सेकंदाचा लहान व्हिडीओ आतापर्यंत २.५ मिलिअनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा भुकेला वाघ पाण्यातून वाट काढत हळू हळू बदकाच्या जवळ येत आहे. पण वाघाचा हल्ला होताच बदक डुबते आणि पाण्यात गायब होते. मात्र हे सर्व इतक्या जलद होते की वाघाला काय झाले हे कळतच नाही आणि तो आजूबाजूला पाहतो पण बदक सापडत नाही.

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की वाघ अगदी दबक्या पावलाने बदकावर हल्ला करण्यासाठी पुढे आला. मात्र वाघाने हल्ला करण्याआधीच बदक पाण्यामध्ये दिसेनासा झाला. हे पाहून वाघ चकित झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. बदक वाघाच्या पाठीमागून पाण्यातून बाहेर आला.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

हा व्हिडीओ बुईटेन्जेबिडेन या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, मात्र यामध्ये ठिकाण उघड करण्यात आलेले नाही. एका युजरने ट्विट केले की, ‘बदके साधारणपणे वाघांपेक्षा हुशार असतात असे दिसते.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘बदक इतका आत्मविश्वासी होता की त्याने उडण्याचीही तसदी घेतली नाही. त्याने एका बाजूने निवांतपणे पाण्यात डुबकी मारली आणि तो दुसऱ्या बाजूने बाहेर आला.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

तथापि, वाघ-अभ्यागतांच्या मनोरंजनासाठी अनेक प्राणीसंग्रहालयात बदकांचे पंख कापून तलावात टाकली जात असल्याचा संताप काही वापरकर्त्यांनी व्यक्त केला. या वापरकर्त्यांनी काही युट्युब व्हिडीओच्या लिंक्स देखील पोस्ट केल्या ज्यात चीनमधील प्राणीसंग्रहालयात तीन वाघांसमोर बदक फेकताना दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, व्हायरल झालेला एक व्हिडीओ ज्यामध्ये कासवांचा एक गट नदीतील अस्थिर लॉगवर संतुलन ठेवताना दिसत आहे, इंटरनेट वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

Story img Loader