Little Girl Dance: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली स्वातंत्र्यदिनानिमित्त सादरीकरण करताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस पार पडला, या दिवशी जागोजागी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला गेला. सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत. अशातच एका चिमुकलीचा स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली परदेशातील रस्त्यावर ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यातील चिमुकलीच्या स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहण्यासारख्या आहेत. यावेळी चिमुकलीचा डान्स पाहून तिच्या आसपास असलेले लोक तिच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत.

हेही वाचा: बापरे! राखी बांधता बांधता भावाच्या दाढीला लागली आग; Video पाहून युजर्स म्हणाले, “गिफ्ट दिलं नाही म्हणून…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर चाळीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘मन जिंकलं मुली’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘जय हिंद, जबरदस्त डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खतरनाक डान्स, एकदम भारी.’

Story img Loader