जगात एक एक अशा गोष्टी आहेत की, त्या कळल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी तर त्यावर आपला विश्वास बसत नाही. रोज नव्या आश्चर्याची नोंद होत असते. खास वैशिष्ट्यांमुळे त्या त्या गोष्टींची चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लांब नाव असलेल्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणाचं नाव इतकं मोठं आहे की, ते वाचून तुमची बोबडी वळेल, यात शंका नाही. हे ठिकाण त्याच्या नावामुळे जगभर प्रसिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर ‘टॉमेटा’ नावाची टेकडी आहे. खरे तर हे या टेकडीचे छोटे नाव आहे. खरं नाव पाहिलं तर तुम्हीला गरगरल्यासारखं वाटेल. ‘Taumata­whakatangihanga­koauau­o­tamatea­turi­pukaka­piki­maunga­horo­nuku­pokai­whenua­ki­tana­tahu’असं या टेकडीचं नाव आहे. वाचताना दमछाक झाली की नाही. असंच प्रत्येकाचं होत आहे. खरं तर हे नाव स्थानिक भाषा माओरीमध्ये लिहिलेले आहे. याचा अर्थ आहे असा की, ‘ज्या शिखरावर एक गिर्यारोहक, एक जमीन गिळणारा आणि टमाटी नावाचा माणूस मोठ्या गुडघ्यांसह आपल्या प्रियजनांसाठी बासरी वाजवत होता’. या पूर्ण नावात एकूण ८५ अक्षरे आहेत. आता या टेकडीवर राहणार्‍या लोकांचा विचार करा, जेव्हा ते त्यांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये हे नाव भरतील तेव्हा त्यांचे काय होत असेल. नावाचे स्पेलिंग बरोबर आहे की नाही हे पाहण्यात अर्धा दिवस जात असेल. या ठिकाणाला स्थानिक योद्ध्याचे नाव देण्यात आले आहे. तुम्हाला हे नाव अवघड वाटेल पण इथल्या लोकांना या नावाचा अभिमान वाटतो.

स्थानिक लोक या ठिकाणाला टॉमेटा किंवा टॉमेटा हिल म्हणून संबोधतात. या टेकडीची एकूण उंची ३०५ मीटर आहे. या टेकडीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब नाव असलेले ठिकाण म्हणून नोंदवले गेले आहे.