मगरीला पाण्यातील सर्वात भयानक प्राणी मानले जाते. ‘पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नये.’ ही म्हण तुम्ही नक्की ऐकली असेल. ज्या नदीमध्ये मगरी असतात त्या नदीच्या आसपास माणूसच काय, तर इतर प्राणीही भटकत नाहीत. पाण्यामधील मगरीशी टक्कर म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण. असं असताना देखील सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो बघून भीतीने तुमच्या तोंडचं पाणी पळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण असे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत ज्यात मगरी इतर प्राण्यांची शिकार करतात. इतकंच नाही तर जंगलाचा राजा सिंह देखील मगरीला घाबरतो. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक माणूस एका मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारतो. हा माणूस न घाबरता तलावात उतरतो. मध्येच तो एका मगरीला आपल्या हाताने उचलतोही.

Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

व्हायरल होणार हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नेटकरी म्हणत आहेत की ज्या मगरी कोणत्याही प्राण्याला एका झटक्यात लोळवू शकतात, त्या या माणसाचं काहीही करू शकत नाही आहेत. तथापि, हा व्हिडीओ पाहून असे वाटते की या इसमाने या मगरींना पाळले आहे. ज्या प्रकारे तो मगरींना हाताळत आहे त्यावरून असे दिसून येते की तो या मगरींचा ट्रेनर आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The man descended into a pond filled with crocodiles you too will be shocked to see what happened next pvp