सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून आपल्याला जवानांचा अभिमान वाटतो. कधी गडबडीत रेल्वे पकडण्याच्या नादात प्लेटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवान जीव संकटात टाकून वाचवतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक CISF जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर लोकांनी या जवानांच्या कार्यतत्परतेचं खुप कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मांजर पाळल्यास हार्ट अटॅक येणार नाही? ९५०० वर्षे जुना आहे माणूस आणि मांजर यांच्यातील ‘हा’ संबंध, जाणून घ्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानतळावर पडला असून या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत विमानतळावर उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी सीपीआरच्या मदतीने त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. जवान बेशुद्ध व्यक्तीचे प्राण वाचवत असताना एका व्यक्तीने त्या घटनेचा व्हिडीओ शूट केला होता. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Video: हृदयाने साथ सोडली, १० मिनिट शून्य हालचाल आणि तेवढ्यात ‘तो’ आला.. IKEA मधील थक्क करणारा अनुभव

या व्हिडीओमध्ये एक माणूस जमिनीवर कसा बेशुद्ध पडला असून सीआयएसएफचे जवान त्याला मदत करत आहेत. ते त्या व्यक्तीची छाती दाबत आहेत. तर आणखी एक जवान बेशुद्ध व्यक्तीचे हात चोळताना दिसतं आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कसल्याही संकटात असली तरीही त्यांचा जीव वाचवण्यासाठी जवान कसे कार्यतत्पर असतात हेच या व्हिडिओतून पाहायला मिळतं आहे.

हेही पाहा- Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ भाजप नेते सुनिल देवधर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ मिलियनहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.तर या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतं आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘जवानांनी या व्यक्तीला जीवनदान दिलं आहे, CISF जवानांचा आम्हाला अभिमान आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The man had a heart attack at the airport jawan saved his life with the help of cpr jap