आपण सोशल मीडियावर अनेक जुगाडचे व्हिडीओ पाहतो. अनेक व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो. असे देसी जुगाड असणारे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जो जुगाड केला आहे ते पाहून आपल्याला नक्कीच धक्का बसेल. या तरुणाने जुगाडच्या मदतीने आपल्याला तुटलेल्या सायकलचे रूपांतर एका स्कुटीमध्ये केले आहे. हे पाहून नेटकऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. या व्यक्तीकडे स्कुटी नव्हती. यानंतर त्याने जुगाड करून एका तुटलेल्या सायकलपासून इकोफ्रेंडली स्कुटी तयार केली. यानंतर तो अगदी स्टाईलमध्ये रस्त्यावर या स्कुटीने फेरफटका मारत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, ही व्यक्ती स्टाईलमध्ये फेरफटका मारत आहे. समोरून ती अगदी एका सुंदर स्कुटीसारखी दिसते आहे. परंतु आपण जवळून पाहिले तर ही स्कुटी नाही, तर एक सायकल आहे हे आपल्या लक्षात येईल. या माणसाने आपल्या कौशल्याच्या जोरावर या सायकलचे रूपांतर स्कुटीमध्ये केले आहे. विशेष म्हणजे ही स्कुटी पेट्रोलशिवाय चालते.

Viral Video : आता शाकाहारी लोकांनाही खाता येणार मासे; सोशल मीडियावर व्हायरल होतेय Vegetarian Fish Fry Dish

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता २८ नाही, तर ३० दिवसांचा असेल रिचार्ज प्लॅन; TRAIचे टेलीकॉम कंपन्यांना निर्देश

fun_life_4 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जुगाडचा हा व्हिडीओ लोकांना इतका आवडत आहे की ते अन्य प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने कमेंट केली की, ‘पेट्रोलच्या किमतींमुळे त्रासलेल्या तरुणाने बनवली इको फ्रेंडली स्कूटी.’

Story img Loader