सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्यासाठी आजकाल अनेक लोकं नको ते धाडस करत असतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. कधी कधी हे अनोख धाडसं करणं अतिउत्साही लोकांच्या जीवावरही बेतू शकतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका अतिउत्साही व्यक्तीला आणि त्याचा व्हिडीओ शूट करणाऱ्या मित्राला सापाची छेड काढणं चांगलचं महागात पडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सापाची छेड काढणे आणि विनाकारण त्याच्याशी खेळणे हे अनेकांना महागात पडू शकतं हे तुम्ही ऐकलं असेल, आता तुम्ही ते पाहणार आहात. कारण, एका व्यक्तीने सापासोबत केलेली मस्ती त्यांच्या अंगलट आली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Video: चक्क मगरीच्या तोंडात हात घालण्याचा स्टंट करत होता हा माणूस; पुढे झाले असे काही की…

या व्हिडीओत एक काळ्या रंगाचा साप इकडे तिकडे फिरण्याचा मार्ग शोधत असताना एक व्यक्तीने झाडू घेऊन सापाला दाबण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सापही त्या माणसाला घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. पण झाडूवाला पुन्हा सापाला दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सापही संतापला आणि चिडलेला साप त्या व्यक्तीकडे धावून गेला. सापाने अचानक उलटा हल्ला केल्यामुळे तो माणूस घाबरुन सापाला झाडूच्या सहाय्याने सापाला झटकण्याचा प्रयत्न करतो. यावेळी साप त्याच्याकडून जोरात फेकला जातो.

त्याने फेकलेला साप हवेत उडत व्हिडीओ शूट करणाऱ्या कॅमेरामनच्या अंगावर पडतो. या घटनेमुळे व्हिडीओ काढणाऱ्याच्या तोंडच पाणी पळाल्याचं आणि तो सैरावैरा धावत सुटल्यातं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. शिवाय कॅमेरामन सापासारखा आपला कॅमेरा हलवत असल्याचंही व्हिडीओमध्ये जाणवत आहे. व्हिडीओच्या शेवटच्या भागात साप दुसऱ्या बाजूला पडतो त्यामुळे कॅमेरामन आणि त्याच्या कॅमेरामन दोघेही सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे दिसून येतं आहे. पण हा व्हिडीओ पाहून अनेकजण सापाच्या नादाला न लागण्याचा धडा घेतील यात काही शंका नाही. हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The man tried to catch the snake and the snake attacked on cameraman jap
Show comments