सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला आयुष्यभर धडपड करत असते. पण जर्मनीमधील एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी स्वत:च्या सुंदरतेमुळे त्रस्त आहे. कारण तिला पाहण्यासाठी लोक जाणीवपूर्वक कायदा तोडत आहेत. सोशल माध्यमांवर या महिला पोलीस कर्मचा-यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
जर्मनीच्या वाहतूक पोलीस कर्मचारी एड्रिन कोलेझरचे फिटनेस व सुंदरता सगळयांना भूरळ घालणारी आहे. सोशल माध्यमांवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या छायाचित्रांना मोठया प्रमाणात पसंद केले जाते. इतकेच नाही तर लोक तिच्या जवळ जावून स्वत:ला अटक करण्याची गळ घालतात. तिला फक्त पाहण्यासाठी लोक कायदा तोडत असल्याचे चित्र आहे. एड्रिन रोज आपल्या व्यायामाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील खूप जास्त आहे. दोन वर्षापूर्वी याच कारणामुळे ती चर्चेत आली होती. पण यामुळे आपल्या वरिष्ठांना काहीही अडचण नसल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते. पण चालू वर्षाच्या सुरूवातीचे सहा महिने तिला बिन पगारी सुट्टीवर पाठविण्यात आले होते.
मॉडेल ऐवजी पुन्हा पोलीस कर्मचारी म्हणून रूज व्हावे या उद्देशाने तिला सुट्टीवर धाडण्यात आले होते. पण तरीही तिची लोकप्रियेता घटली नाही. आता तर सॅक्सोनी राज्याच्या पोलीस विभागाने ३४ वर्षीय एड्रिनला नोटीस पाठवली आहे.
एक तर पोलीस कर्मचारी म्हणून काम करा किंवा मॉडेल सारखे सोशल माध्यमांवर फोटो टाका, अशी तंबी तिला देण्यात आली आहे. त्यामुळे इतर महिला सुंदर दिसण्यासाठी धडपत असताना एड्रिएनला मात्र स्वत:ची सुंदरता डोकेदुखी ठरत आहे.
Instagram वर ही पोस्ट पहा