Viral Video : लग्न हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करतात. लग्नानंतर या दोन व्यक्तीचे आयुष्य बदलते विशेषत: भारतीय विवाहानुसार लग्नानंतर नववधूला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आईवडीलांचे घर सोडून सासरी जावे लागते. लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते, तो क्षण तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप भावुक करणारा असतो. एकदिवस प्रत्येक आई वडीलाला त्यांच्या मुलीचे कन्यादान करावे लागते. कन्यादानाच्या वेळी नवरी आणि आईवडीलांच्या डोळ्यात पाणी येतं.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कन्यादान करताना आईवडील रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. मुलीच्या लग्नात आईवडील कन्यादान करताना दिसत आहे. कन्यादान केल्यानंतर आईवडील भावुक होतात आणि त्यांचे अश्रु अनावर होतात. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आईवडील डोळ्यातील अश्रु पुसताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक गायिका सुंदर गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याचे लिरीक्स ऐकून तुम्हालाही रडू आवरणार नाही.

हेही वाचा : “संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो” लेक पोलीस झाल्याचं कळताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला; भररस्त्यातला VIDEO व्हायरल

गायिका गाणं गाते, “तु मेरी बाहो के झुले मे पली लाडो, जा रही है छोड के मेरी लगी लाडो. खुबसुरत वो जमाने याद आयेंगे, चाहकरभी हम तुमको भूल ना पाऐंगे. मुश्किल अश्को को छुपाना लगता है.. मुश्किल अश्को को छुपाना लगता है.. एक दिन तो ‘कन्यादान’ करना पड़ता है” हे लिरीक्स ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

shelly.soulfulmusic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक दिन ‘कन्यादान’ तो करना पड़ता है” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझी मुलगी फक्त सहा वर्षांची आहे पण हा व्हिडीओ पाहून डोळे भरून आले.” तर एका युजरने लिहिलेय, “मी आजही लग्नातील कन्यादान करतानाचा व्हिडीओ पाहते, तेव्हा मला रडू येते.”आईवडीलांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस” अनेक युजर्सनी या गायिकेचे सुद्धा कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर आवाज आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “तुमचं गाणं ऐकून डोळे भरून आले.”