Stray Dogs Heartwarming Video : गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. पण, आता एका भटक्या श्वानासंदर्भात असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तेही एक जीव आहेत, त्यांनाही भावना, संवेदना असतात याची जाणीव होईल. माणूस एकवेळ भीक मागून, मिळेल ते काम करून आपलं दोन वेळचं पोट भरू शकतो. पण, प्राण्यांचं तसं नाही. त्यांना कोणी दिलं तर किंवा कचऱ्यात पडलेल्या गोष्टी खाऊन आपलं पोट भरावं लागत. काही वेळा मिळालं नाही तर उपाशी राहण्याचीही वेळ येते. व्हायरल व्हिडीओत असाच एक भूकेने व्याकूळ झालेला श्वान रेल्वेस्थानकावर ट्रेनची वाट पाहताना दिसतोय. यावेळी मोटरमन आपल्याला खायला देणार या आनंदाने धावत तो त्याच्या दिशेने जाताना दिसतोय. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओतून माणसातील माणुसकी अजूनही जिवंत आहे याची जाणीव होते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, भूकेने व्याकूळ झालेला एक श्वान सुमसान रेल्वेस्थानकाच्या किनारी बसून ट्रेनची वाट पाहतोय. काही वेळाने ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असल्याचे दिसताच तो खूप आनंदी होतो आणि ट्रेनच्या स्पीडबरोबर धावू लागतो. ट्रेनमधील मोटरमनजवळ पोहचण्यासाठी तो धावत असतो. यावेळी ट्रेन थांबल्यानंतर मोटरमन खाली उतरतो आणि श्वानाला खाण्यासाठी जमिनीवर जेवणाची भरलेली प्लेट ठवतो. अशाप्रकारे रोज हा श्वान ट्रेनच्या मोटरमनची वाट पाहत असतो, त्यामुळे मोटरमन आणि श्वानात एक मैत्रीपूर्ण बंध तयार झाला आहे.
हेही वाचा : पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ Hakan kapucu नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका ट्रेनचा मोटरमन रेल्वेस्थानकावरील या श्वानाला खायला देतो. ज्या ट्रेनमधील मोटरमन त्याला रोज खायला देतो, ती ट्रेन श्वानाच्याबरोबर लक्षात आहे. ट्रेन येताच श्वानाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. तुम्ही प्रत्येकाला आनंद देऊ शकत नाही, परंतु तुमच्यातील दयाळूपणा नेहमीच तुम्हाला आनंद देऊ शकतो. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ अनेक युजर्सनादेखील आवडला आहे, अनेकांनी मोटरमनमधील माणुसकी आणि दयाळूपणाचे कौतुक केले आहे.