Viral video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका उंदरानं आपल्या पिल्लाला सापाच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे.
आजपर्यंत तुम्ही सापाला फक्त मुंगूसला हरवताना पाहिलं असेल, पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक उंदीर कसा सापाशी लढतो आणि त्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडवतो हे तुम्हाला दिसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उंदीर आणि साप यांच्यातील या संघर्षाची संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका छोट्या उंदराला साप तोंडात धरून बसला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साप उंदराला खाण्यासाठी तयार आहे, मात्र तेवढ्याच उंदराची आई येते आणि सापावर हल्ला करतो. आणि तिच्या मुलाला सापापासून सोडवण्याचा प्रयत्न करते.यावेळी अनेकदा साप उंदरावर हल्ला करतो, परंतु उंदीर हार मानत नाही आणि शेवटी आपल्या मुलाला सापाच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होते. आता साप आणि उंदीर यांच्यातील या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C1YiQy2Nwp_/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा >> खतरनाक! गायीने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेवर केला हल्ला; ‘हा’ Video पाहून थरकाप उडेल
onlyanimalz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जे आतापर्यंत २७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… हे आईचे प्रेम आहे.