भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने इतिहास घडवला आणि १०० वर्षांचा ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचा दुष्काळ संपला. १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतर नीरजवर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सोशल नेटवर्किंगवरुनही त्याच्यावर सर्वच स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये कौतुक, अभिमान याबरोबरच मीम्सचाही पाऊस पडलाय. अनेकांनी मजेदार मीम्स शेअर करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केलाय. या मिम्समध्ये अनेकजण नीरजचा संबंध दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी जोडताना दिसत आहे. अभिनेता रणदीप हुड्डानेही असाच संबंध जोडत एका मजेदार ट्विटच्या माध्यमातून नीरजचं हटके स्टाइलने अभिनंदन केलंय.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?

नीरजच्या यशामगील रहस्य असं म्हणत रणदीपने एक फोटो शेअर केला आहे. या फोटमधून त्याने नीरज आणि रजनीकांत यांच्यामधील खास कनेक्शनबद्दल भाष्य केलं आहे. तसं वर वर पाहिलं तर २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज आणि ७० वर्षीय सुपरस्टार रजीनकांतमध्ये काहीच साम्य दिसत नाही. मात्र त्यांच्या नावामध्ये एक वेगळं बॉण्डींग असल्याचं नेटकऱ्यांना जाणवलंय आणि त्यात रणदीपही सहभागी झालाय. “नीरज नीरज नीरज” असं सतत ओरडल्यास तुम्हाला रजनी रजनी असं ऐकू येईल. आता तुम्हाला कळलं का त्याच्या यशामागील रहस्य. रजनी सगळीकडे आहे, असं या फोटोवर लिहिण्यात आलेलं आहे. हा व्हायरल फोटो रणदीपने शेअर करत, “हे पुरेसं आहे,” असं म्हणत डोळा मारणारा आणि हसणारा इमोंजी पोस्ट केलाय.

सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या रजनी जोक्सपैकीच हा एक लेटेस्ट व्हायरल जोक असून आता नेटकऱ्यांनी नीरजचं कनेक्शन रजनीशी जोडल्याचं पहायला मिळत आहे. रजनीकांत हा जगातील सर्वात भारी व्यक्ती असून तो सुपरह्यूमन आहे अशापद्धतीचे जोक या ट्रेण्डमध्ये व्हायरल केले जातात. त्याचाच हा प्रकार असून नीरजच्या यशामागे हा रजनी नावाचा अदृष्य हात असल्याचं याच ट्रेण्डअंतर्गत सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही व्यक्तींचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीय हे ही महत्वाचं.

नक्की पाहा >> “फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय”; Viral झाला मोदींच्या आवाजातील श्याम रंगीलाचा व्हिडीओ

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने यावर रिप्लाय केलाय. हे कनेक्शन पाहून तिने मग या नीरजच्या कमागिरीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याची काहीच गरज नाही अशी प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

नेमबाज हीना सिंधूनेही रणदीपचे हे ट्विट इमोजी वापरुन रिट्विट केलंय.

तर एकाने मग नीरजने भाला काही किलोमीटर फेकला असेल अशी कमेंट या फोटोवर केलीय.

रणदीपचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader