सोशल मीडियावर सध्या अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये कधी अंगावरती शहारा आणणारे तर कधी आपणाला पोट धरुन हसवणारे व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण एका पक्षाने चक्क म्हशीच्या डोक्यावर आपलं घरटं तयार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणाला जंगलातील विचित्र आणि कधीही न पाहिलेले वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण, जंगलात किंवा शहरांमध्ये आढळणारे पक्षी इतर शिकारी प्राण्यांसह पक्ष्यांपासून स्वत:चे, पिल्लांचे आणि अंड्याचे संरक्षण व्हावे यासाठी उंच झाडांच्या फांद्यांवर घरटी बांधतात.

हेही पाहा- Video: मोठ्या भावाने दिलेलं गिफ्ट पाहून लहानग्याला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, ‘भाऊ असावा तर असा’

मात्र, सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक पक्षाने चक्क म्हशीच्या डोक्यावर घरटे बनवल्याचं दिसतं आहे. म्हशीच्या डोक्यावर घरटे बनवल्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @NarendraNeer007 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

शिवाय हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना पक्षी ‘Z+ सुरक्षेमध्ये एक छोटासा पक्षी’ असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून अनेक नेटकऱ्यांनी हे घरटे जास्तकाळ सुरक्षित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. कारण, ज्या म्हशीच्या शिंगावर हे घरटे बनवले आहे ती म्हैस चालताना किंवा धावताना पक्ष्यांच्या घरट्याचे आणि अंड्यांचे काय होईल? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The nest is made by a bird between the horns of a buffalo and not on a tree jap