Mother son video: आई ही आई असते. कुणाचीही असो पण आई ग्रेटच असते. ९ महिने पोटात असताना बाळाची काळजी घेतल्यावर जेव्हा ते या जगात येतं तेव्हा तो कोणत्याही आईसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. ज्याला ९ महिने जीवापेक्षा जास्त जपलं त्याला पाहण्याचा तो आनंद त्या आईसाठी सगळ्यात खास असतो. बाळाचा पहिला स्पर्श हा आयुष्यभर तिच्या आठणीत राहतो. आईला मुलाच्या प्रत्येक भावना आधीच समजतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मुलं जन्मल्यानंतर प्रचंड रडत आहे मात्र आईनं चुंबन घेताच ते बाळ क्षणात शांत झालं. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हालाही मातृत्वाची पहिली भेट आठवेल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवजात बाळ जन्मल्यानंतर खूप रडत असल्याचे दिसून येते. नर्स त्याला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते पण मूल गप्प बसत नाही. यानंतर नर्स त्याला त्याच्या आईकडे घेऊन जाते. यावेळी आई तिच्या नवजात मुलाला चुंबन घेते. आई जवळ आल्यावर मुल रडणे थांबवते आणि झोपी जाते. हे पाहून आजूबाजूचे लोकही अवाक् झाले आहेत. कारण आईच्या स्पर्शात किती ताकद असते याचं उदाहरण यातून पाहायला मिळालं.
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheFigen_ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ८ दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! बोअरवेलला इतकं पाणी लागलं की मोटरच १०० फूट हवेत उडाली; अहमदनगरमधील अजब घटनेचा VIDEO व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आई ही आई असते.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडिओ.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूपच क्यूट व्हिडिओ.’