पाकीट किंवा वस्तू हरवण्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. मेहनती कमावलेले पैसे किंवा वस्तू जेव्हा हरवते तेव्हा सहाजिकपण प्रत्येकाला वाईट वाटते पण. तुमचे कधी पाकीट हरवले आहे आणि ते पुन्हा सापडले तर? नक्कीच तुम्हाला आनंद होईल. पण एखाद्या व्यक्तीचे पाकीट जर समुद्रात पडले तर त्याला मिळेल का? तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? पण अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे.

ब्रिटिश कोलंबियाच्या टोफिनो येथील रहिवासी असलेल्या मार्सी कॅलेवार्ट जॉनला हिचे पाकीट समुद्रात टाकल्यानंतर आठ महिन्यांनी सापडले. मार्सी तिच्या कुत्र्यांना स्थानिक समुद्रकिनारी फिरत असताना किनाऱ्यावर धूत असताना पाकीट दिसले.

stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
raha kapoor birthday mommy alia bhatt shares sweet picture and write special post
“तू फक्त काही आठवड्यांची होतीस…”, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आलियाने शेअर केला २ वर्षांपूर्वीचा फोटो, राहाला म्हणाली…
Why aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new car
‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने स्वतःसाठी नाही तर ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली आलिशान गाडी, म्हणाली, “ती गाडी माझी नसून…”

मार्सीने सुरुवातीला तिचा अनुभव TikTok वर शेअर केला, ज्याला जवळपास लाखो व्ह्यूज मिळवले. तिने १५ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर ही गोष्ट पोस्ट केली होती

जून २०२३ रोजी मार्सीचे पाकीट हरवले होते. टोफिनोच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर बोटीतून प्रवास करत असताना चुकून तिचे पाकीट समुद्रात पडले. घटनेनंतर तातडीने तिने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्नॉर्केलिंग सर्च ( snorkelling searches) म्हणजेच समुद्रतळाशी जाऊन शोध मोहिम केली आणि समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी स्कुबा डायव्हरही नियुक्त केला. पण एवढे प्रयत्न करूनही पाकीट मात्र कुठेही सापडले नाही. पण या घटनेच्या आठ महिन्यांनंतर, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी, मार्सीला तिचे पाकीट किनाऱ्यावर सापडले आणि त्यात तिसे सर्व सामान तसेच होते.

मार्सीने इंस्टाग्रामवर तिचा अनुभव शेअर केला, “काल, कुत्र्यांना फिरायला घेऊन गेले असताना, मला माझे पाकीट सापडले जे मी ८ महिन्यांपूर्वी बोटीतून प्रवास करताना समुद्रात पडले होते मला ते शोधण्यासाठी स्कुबा डायव्हर नियुक्त केला होता, मी ते शोधण्यासाठी समुद्र तळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण काहीही सापडले नाही. मला आशा होती की, ते जवळपास राहील आणि समुद्राच्या लांटासह समुद्रावर येईल आणि काही दिवसांनंतर शेवटी ते मिळाले.”

हेही वाचा – “पोटासाठी काही पण..!” डोक्यावर केळ्याचं मुकुट, गळ्यात संत्र्याचा हार घालून रस्त्यावरील फळ विक्रेत्याचा Video Viral

“माझा व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाला आहे, एकत्रितपणे ७ दशलक्ष+ व्हुयज मिळाले आणि जगभरातील मीडिया आणि एजन्सींनी माझ्याशी संपर्क साधला आहे. या मुद्याकडे किती लक्ष दिले जात आहे हे पाहणे थोडे मजेदार आहे.”

हेही वाचा – Video : MS DHONIचा फोटो समोर ठेवून तरुणीने तब्बल ८ तासात पूर्ण केले ११८०६ स्क्वॉट्स; गिनीज बुकमध्ये झाली नोंद!

पोस्ट व्हायरल झाल्यापासून इंस्टाग्रामवर खूप पसंती मिळत आहे.

“हे अप्रतिम आहे. किती छान गोष्ट आहे. मला तुमच्या पाकीटच्या प्रवासाबद्दल ऐकण्यासाठी मुलाखत ऐकायला आवडेल? असे,” एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने सांगितले.

“व्वा. ते खूप छान आहे. ते पाकीट शोधण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर, आता ते परत मिळवणे खूप आश्चर्यकारक वाटले पाहिजे,” दुसरी व्यक्ती म्हणाली.

“हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे. तुमच्यासाठी खूप आनंद झाला,” असे एकाने लिहिले