आता पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका वृद्ध व्यक्तीशी संबंधित आहे. या व्हिडीओमध्ये ते फुटबॉलच्या मैदानात जबरदस्त कारनामे करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस ट्रक ड्रायव्हर असून तो ६४ वर्षांचा आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की, त्याला लहानपणापासूनच या खेळाची आवड असावी.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या वृद्धाचे नाव जेम्स असून त्याला फुटबॉलची खूप आवड आहे. व्हिडीओमध्ये तो प्रोफेशनलसारखा फुटबॉल खेळताना आणि आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये जेम्स फुटबॉलपटू प्रदीपसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. तो एखाद्या प्रोफेशनलसारखा बॉल उचलतो आणि लाथ मारतो. याशिवाय तो फुटबॉलचा समतोल डोक्यावर आणि खांद्यावरही करतो.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

जेम्स त्याचे घर चालवण्यासाठी ट्रक चालवतो आणि लॉरीमध्ये त्याच्यासोबत फुटबॉल किट देखील घेऊन जातो. तो वायनाड फुटबॉल संघाचाही भाग राहिला आहे. हा व्हिडीओ prsoccerart नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत.तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत १० लाख ९० हजाराहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

Story img Loader