Viral Video : काहीजण प्राणीप्रेमी असतात, ते प्राण्यांना अगदी प्रेमाने सांभाळतात. त्यांना प्राण्यांच्या विरोधात घडणारी एकही गोष्ट सहन होत नाही. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने भिंतीवर कुत्र्याचं लावलेलं पोस्टर काढून टाकले म्हणून एका महिलेने तरुणाला मारले. हे प्रकरण ताजं असताना नोएडामध्ये आणखीन एक घटना घडली आहे. काहीजण प्राण्यांना बघून त्यांच्यापासून पळ काढतात. प्राण्यांना घाबरणाऱ्या अनेकांना प्राणी आपल्याला ईजा पोहचवतील याची भीती मनात असते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये एक लहान मुलगा कुत्र्याला घाबरत असतो, पण अज्ञात मालक कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्याचा हट्ट करू लागतो आणि पहारेकरी आणि अज्ञात महिलेशी भांडू लागतो.
प्रकरण असे आहे की, बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये एक लहान मुलगा आधीपासून उभा असतो. तसेच एक तरुण स्वतःचा कुत्रा घेऊन येतो. लिफ्टमध्ये आधीपासून उपस्थित लहान मुलाला कुत्र्याची भीती वाटत असते म्हणून तो कुत्र्याच्या मालकाला कुत्रा आतमध्ये घेऊन येण्यापासून थांबवत असतो. पण, कुत्र्याचा मालक कुत्र्याला बांधून ठेवलं आहे असे सांगतो आणि त्याच लिफ्टने कुत्र्याला घेऊन जायचा हट्ट करत असतो. त्यामुळे पहारेकरी, एक अज्ञात महिला आणि कुत्र्याचा मालक या तिघांमध्ये वाद सुरू होतो.
तसेच एक अज्ञात महिला या प्रकरणाचा व्हिडीओ शूट करत असते आणि तरुणाला म्हणते, कुत्र्यापासून एखाद्याला भीती वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळ बाहेरच थांबायला पाहिजे. पण, कुत्र्याला सोबत घेऊन येणारा तरुण सारखं एकच वाक्य बोलताना दिसत आहे की, मी कुत्र्याला बांधून ठेवलं आहे आणि तरीसुद्धा जर कोणाला कुत्र्याची भीती वाटत असेल तर त्याने लिफ्टमधून बाहेर यावे. मी का बाहेर थांबू ? अशा शब्दात कुत्र्याचा मालक एका अज्ञात महिलेसोबत भांडताना दिसत आहे.
पोस्ट नक्की बघा :
भांडणानंतर मालक कुत्र्याला दुसऱ्या लिफ्टमधून घेऊन जातो :
अज्ञात महिला तरुणाला त्याचा रूम नंबर विचारते, तेव्हा तरुण अगदीचं उद्धट उत्तर देतो आणि म्हणतो, आता चेहरा पाहिलात मग रूम नंबर ऐकून काय करणार ? असे म्हणतो. नंतर कुत्र्याचा मालक पहारेकरी सोबतसुद्धा भांडत असतो. बिल्डिंगमध्ये दोन लिफ्ट असतात, तर भांडणानंतर थोड्या वेळाने तरुण कुत्र्याला दुसऱ्या लिफ्टमध्ये घेऊन जातो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @GreaterNoidaW या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नोएडाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून काहीजण कुत्र्याच्या मालकाची बाजू घेत आहेत, तर काहीजण लहान मुलाची बाजू घेत आहेत. अनेकजण हा विषय उगीचच ताणला जातोय असे म्हणताना दिसत आहेत.