सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्याला धक्का बसतो आणि काही व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद होतो. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका गाडीमध्ये एक कुत्रा अडकलेला दिसत आहे. खूप वेळ गाडीत राहिल्यामुळे त्याचा जीव गुदमरत होता. त्याच्या मालकाने त्याला गाडीत लॉक केले होते. बराच काळ गाडीत बंद राहिल्यामुळे कुत्रा अस्वस्थ झाला होता. अशास्थितीमध्ये पोलिस त्याच्या मदतीला देवासारखे धावून आले. उतराखंड पोलिसांच्या काही जवानांनी गाडीची काच तोडून कुत्र्याला बाहेर काढले आणि त्याला पाणी प्यायला देऊन शांत केले. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारे एक कुत्रा कारच्या आतमध्ये श्वास घेण्याचा प्रयत्न करतोय. गाडीची काच उघडत नसल्यामुळे त्याला श्वास घेण्यास खूप अडचण होत आहे. हा व्हिडिओ एका आयपीएस अधिकारी अशोक कुमार याने ट्विटरव शेअर केला आहे. या व्हिडिओबाबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , ”पोलिस जवानांने श्वानाचा जीव वाचवला. रुद्रप्रयाग येथील सोनप्रयाग पार्किंगमध्ये बंद गाडीमध्ये सोडलेल्या एका श्वानाला अस्वस्थ पाहून आमच्या @uttarakhandcopsच्या SI वंदना आणि ASI राहूल यांनी काच तोडून बाहेर काढले आणि पाणी पाजले.”
हेही वाचा – इंडिगोचं विमान निघालं अहमदाबादला, पोहलचं पाकिस्तानमध्ये! अर्ध्या तासानंतर आलं भारतात
नेटकऱ्यांनी व्यक्ती केली प्रतिक्रिया
याव्हिडिओला आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. कित्येक लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजरने कमेंट करताना लिहिले की, ”चांगले काम केले उत्तराखंड पोलिसांनी वाहनाच्या मालकाला याबाबत सक्त ताकीद देण्याची गरज आहे ज्यामुळे अशी घटना पुन्हा घडणार नाही.”तसेच आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ”खूपच चांगले काम केले आहे”