Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. ज्यात कधी लोक असे काहीतरी जुगाड करतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. तर कधी प्राण्यांमधील प्रेम, भांडणं अशा विविध गोष्टी आपल्या समोर येतात जे पाहून आपणही आश्चर्यचकित होतो. विविध प्राण्यांच्या अशा अनेक गोष्टी नेहमीच समोर येतात त्यात काही नवल नाही. पण आता एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण बोलणारा पोपट नेहमीच पाहिला आहे, जो नेहमी त्याला शिकवलेल्या गोष्टी बोलतो. पोपटाचे बोलणे ऐकण्यासाठी नेहमीच लोक उत्सुक असतात. आता देखील अशाच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात पोपट त्याला विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका राखाडी रंगाच्या पोपटासमोर एका व्यक्तीने माईक ठेवला असून ती व्यक्ती पोपटाला एकामागे एक विविध प्रश्न विचारत आहे. यावेळी तो पोपटही सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहे. शिवाय तो यावेळी विविध प्राण्यांचा देखील आवाज काढून दाखवत आहे. तो व्यक्ती पोपटाला प्रत्येक प्रश्नानंतर खाऊ चारत आहे.

हेही वाचा: अविस्मरणीय क्षण! निळ्या आकाशात दिसली उल्का; तरुणीच्या VIDEO मध्ये कैद झाले अद्भुत दृश्य, नेटकरी म्हणाले… “तू खूप लकी”

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @birdslover212 या अकाउन्टवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून ७० हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका युजरने लिहिलंय की, “उत्कृष्ट, आता जेव्हा कोणी मला बर्ड ब्रेन म्हणेल तेव्हा मला वाईट वाटणार नाही.” दुसऱ्या युजरने या पोपटाचे कौतुक करत लिहिलंय की, “किती आश्चर्यकारक पक्षी आहे.”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “काही लोकांपेक्षा तो खूप स्मार्ट आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “हा किती गोड आहे, खूप सुंदर”

दरम्यान, यापूर्वी देखील अशाप्रकारच्या पोपटांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात ते पोपट देखील मानसांच्या आवाजात बोलताना दिसले होते.