माणसाच्या शरीरात दोन किडनी असतात. यातील एक किडनी निकामी झाल्यानंतरही माणूस दुसऱ्या किडनीच्या आधारे जिवंत राहू शकतो. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अफगाणिस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे बहुतांश गावकऱ्यांची एक किडनी गायब आहे. म्हणजेच येथील अधिकतर लोक दोन नाही तर एका किडनीच्या आधारे आपण जीवन जगत आहेत. या गावात अशी शेकडो माणसे आहेत.
एजन्सी फ्रान्स प्रेसनुसार, अफगाणिस्थानच्या हेरात शहराला लागून एक गाव आहे. या गावाचे नाव आहे शेनशायबा बाजार. जगभरात हे गाव ‘एक किडनी असलेले गाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. जर तुम्ही विचार करत असाल की ही त्याची शारीरिक समस्या आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. वास्तविक, येथील लोकांना आपली एक किडनी विकावी लागत आहे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपली एक किडनी विकावी लागत आहे.
Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर
अफगाणिस्थानातील या गावातले लोक गरिबीमुळे इतके लाचार झाले आहेत की त्यांना आपली भूक भागवायला आपले अवयव विकावे लागत आहेत. खरंतर, तालिबानी राजवट आल्यानंतर येथील लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. येथील बहुतांश लोकांनी आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी आपल्या शरीराची एक किडनी विकली आहे.
Viral Video : मगरींनी भरलेल्या तळ्यात उतरला हा व्यक्ती; पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का
आपली किडनी विकण्यासाठी या लोकांना पैसे मिळतात. या पैशांनी ते आपल्या कुटुंबाचे पोट भारतात. या लोकांसाठी काळ्या बाजारात आपले अवयव विकणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. या गावातील बहुतांश स्त्री-पुरुषांनी आपली एक किडनी विकली आहे. येथे एक किडनी सुमारे २ लाख रुपयांना विकली जाते. अफगाणिस्तानच्या चलनात ते अडीच लाख रुपये आहे.