आपल्या देशातील लोक देशी जुगाड करण्यात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या जुगाडांची दखल मोठमोठे उद्योजक घेत असतात. याआधी चार्जिंगवर धावणारी गाडी असो वा इमारतीवर विटा पोहचवण्यासाठी केलेला स्कूटरचा वापर याची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अशातच आता एका बद्दादराने ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील स्पीकरच्या साह्याने क्रिकेट मॅचची कॉमेंट्री केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याची दखल ओला कंपनीच्या सीईओनी घेतली आहे.
भारतीयांना क्रिकेटचं वेड किती आहे हे सांगायची गरज नाही. क्रिकेट म्हटलं की लोक मैदान असो वा रस्ता जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी खेळायला सुरुवात करतात. मोठ्या आयपीएल मॅच पाहून अनेक गाव खेड्यांमध्येही आता क्रिकेट व्यावसायिक होत आहे. शिवाय क्रिकेटसाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या अशाच एका तरुणाने क्रिकेटची कॉमेंट्री करण्यासाठी स्पीकर भेटला नाही म्हणून भन्नाट जुगाड केलं आहे. ते पाहून आपल्या देशातील लोकांच्या टॅलेंटची प्रचिती तुम्हाला येणार आहे.
क्रिकेटची कॉमेंट्री मराठी, इंग्रजी, हिंदीसह अनेक स्थानिक भाषांमध्ये केली जाते. सोशल मीडियावर मजेशीर कॉमेंट्रीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर एका तरुणाने क्रिकेट मॅचची कॉमेंट्री करण्यासाठी देशी जुगाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील स्पीकरच्या मदतीने क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसत आहे.
हेही पाहा- Video: मेट्रोत डुलक्या काढणाऱ्या मुलाला ‘या’ तरुणीने सावरले; शर्टाला धरत वर खेचलं अन…
सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. शिवाय या व्हिडीओची दखल खुद्द ओलाच्या सीईओनी घेतली आहे. ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी आतापर्यंत पाहिलेल्या आमच्या वाहनाचा हा सर्वात क्रिएटीव्ह वापर आहे’
आता खुद्द कंपनीच्या सीईओना हा व्हिडीओ भावला असेल तर नेटकऱ्यांना का नाही आवडणार. त्यामुळे या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून ही आयडीया आपल्या देशातून बाहेर जायला नको असं म्हणत आहेत. तर अनेकांनी आम्ही देखील क्रिकेटच्या कॉमेंट्रीसाठी असला जुगाड करणार असल्याचं म्हटलं आहे.