देशाच्या राजधानीतून अर्थात दिल्लीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी रात्री ८.४३ च्या सुमारासचा आहे. जिथे प्रवाशाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असता. पण वेळीच CISF च्या QRT ने त्या प्रवाशाचे प्राण वाचवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की कुठे घडली घटना?

हा सीसीटीव्ही व्हिडीओ दिल्लीतील शाहदरा मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा आहे. जिथे एक प्रवासी फोनवर बोलण्यात व्यस्त होता. त्यानंतर अचानक तो रुळावर पडला.

(हे ही वाचा: वर्गात मुलांनी शिक्षिकेसमोर दाखवलं आपलं अनोखं टॅलेंट; हा Viral Video एकदा बघाचं)

जवनाने वाचवले प्राण

सीआयएसएफचे क्यूआरटी तेथे गस्त घालत होते. त्याची नजर प्रवाशाकडे पडली. त्यानंतर सीआयएसएफ कॉन्स्टेबल रोहतास यांनी रुळावर उडी मारली आणि खाली पडलेल्या प्रवाशाला शैलेंद्र मेहता यांना रुळावरून उचलून प्लॅटफॉर्मवर नेले. मात्र त्यावेळी मेट्रो रुळावर येत नव्हती हे सुदैव. काही सेकंद उशीर झाला असता, तर कुठेतरी मेट्रोच्या धडकेने प्रवाशाला जीव गमवावा लागला असता.

(हे ही वाचा: Video: आता लग्नसोहळ्यावरही ‘पुष्पा’ची क्रेझ! नवरदेव म्हणतो ‘मैं झुकेगा नहीं…’)

कॉन्स्टेबल रोहतासच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. त्याबद्दल सीआयएसएफचे अधिकारी रोहतासचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The person talking on the phone fell on the metro track and incident captured on cctv ttg