सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या चित्रविचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर सर्वांत लांब नाक असणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटोपाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. या व्यक्तीचे नाव थॉमस वॅडहाऊस असे सांगण्यात आले असून ट्विटरवर हा फोटो सध्या चर्चेत आहे. हिस्टोरिक विड्स या पेजने एका संग्रहालयात ठेवलेल्या मेणाच्या पुतळ्याचा फोटो पोस्ट केला आहे.

१२ नोव्हेंबरला केलेल्या या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की थॉमस वॅडहाऊस यांचे नाक जवळपास ७.५ इंच लांब होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वेबसाइटवरील एक पृष्ठ देखील वॅडहाऊस यांच्या नावावर आहे. या ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ते एका सर्कशीमधील कलाकार होते. हिस्टोरिक विड्सने ट्विटमध्ये म्हटलंय, “थॉमस वॅडहाऊस हे १८व्या शतकातील इंग्रजी सर्कस कलाकार होते. जगभरात ते त्यांच्या लांब नाकासाठी ओळखले जात होते. त्यांच्या नाकाची लांबी ७.५ इंच इतकी होती.”

Viral Video: उडायचा कंटाळा आला म्हणून सीगल पक्ष्याने केला भन्नाट जुगाड; अनोखा स्टंट पाहून नेटकरीही चक्रावले

खरा मित्र कसा असावा? अवघ्या चार वाक्यांमध्ये हर्ष गोएंका यांनी सांगितले खऱ्या मैत्रीचे रहस्य

आतापर्यंत एक लाख २० हजारांहूनही अधिक लोकांनी हे ट्वीट लाइक केले आहे. तर जवळपास साडे सात हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे. अनेकजण यावर आपली प्रतिक्रियाही देत आहेत. दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही आपल्या वेबसाइटवर थॉमस वॅडहाऊस यांच्या कामगिरीची यादी दिली आहे. यामध्ये असं म्हटलंय की थॉमस १७७० च्या काळात इंग्लंड येथे राहत होते आणि ते फिरत्या सर्कशीचे सदस्य होते. तथापि, सर्वात लांब नाक असलेल्या जिवंत व्यक्तीचा विक्रम तुर्कीच्या मेहमेट ओझ्युरेकच्या नावावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या विक्रमाची पुष्टी केली होती. त्याचे नाक ३.४६ इंच लांब आहे.

Story img Loader