२०१३ चा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन विमानांची आकाशातच हवेत टक्कर होताना दिसत आहेत. तेव्हा पायलट आणि प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षितपणे उडणाऱ्या विमानातून उडी मारली. एक विमान जमिनीवर कोसळले, तर दुसरे विमान धावपट्टीवर परत आले. सीएनएनने त्या वेळी वृत्त दिले होते की, चमत्कारिकपणे, नऊ प्रवासी आणि दोन वैमानिकांपैकी कोणीही या अपघातात गंभीर जखमी झाले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अपघात नोव्हेंबर २०१३ मध्ये लेक सुपीरियर, विस्कॉन्सिनजवळ झाला. स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षक माईक रॉबिन्सन यांच्या मते, दोन्ही विमाने एकत्र उडत होती कारण स्कायडायव्हरला एकत्र उडी मारायची होती. तथापि, हा भयानक व्हिडीओ स्कायडायव्हर्स घेऊन जाणारे दोन लहान सेसना ज्वालांमध्ये एकत्र कोसळल्याचा क्षण दाखवतो. फायर फायटर वर्न जॉन्सन म्हणाले की मुख्य पायलटने सांगितले की त्याची विंडशील्ड तुटलेली आहे आणि त्याने उडी मारण्यापूर्वी मोठा आवाज ऐकला. विमान मध्य-हवेत तुटले, परंतु सुदैवाने ते स्कायडाइव्हर्सने भरलेले होते ज्यांनी सुरक्षेसाठी पॅराशूटची व्यवस्था केली.

या घटनेनंतर जवळजवळ आठ वर्षांनी, विमान अपघाताचा हा व्हिडीओ ट्विटरवर पुन्हा समोर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ ३.४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणीमध्ये लिहिले, “हे खूप भीतीदायक होते. प्रत्येकजण वाचला हे ऐकून आश्चर्य वाटले.” दुसरा म्हणाला, “मला विश्वास नाही की कोणीही गंभीर जखमी झाले नाही.” या घटनेबद्दल बोलताना रॉबिन्सनने द गार्डियनला सांगितले, “आम्ही हे सर्व नेहमी करतो. आम्हाला नक्की कशामुळे असं झालं हे माहित नाही.”ते म्हणाले, “आम्ही सामान्य स्कायडाइव्ह करण्यापासून काही सेकंद दूर होतो जेव्हा ट्रेल प्लेन मुख्य विमानावर आला. ते एका मोठ्या फ्लॅश फायरबॉलमध्ये बदलले आणि पंख वेगळे झाले.” ते म्हणाले, “आम्हा सर्वांना माहित होते की आमचा अपघात झाला आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pilot and passengers jumped out of the flying plane as soon as the plane collided video goes viral ttg