सध्या सोशल मीडियावर अमेरिकन नौदलाच्या एका विमानाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हे विमान सुमुद्राच्या पाण्यात अर्धवट बुडाल्याचं दिसत आहे. खराब हवामानामुळे हे विमानाचे थेट पाण्यात लँडिंग केल्याचं सांगितलं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे. बोईंग Poseidon 8-A या विमानाने मरीन कॉर्प्स बेस धावपट्टीवरुन उड्डाण केले आणि त्यानंतर केनोहे खाडीत ते कोसळले, सुदैवाने, विमानातील ८ लोकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या या विमानाच्या अपघाताशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विमान खाडीच्या पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगाळ वातावरण, पाऊस आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाला, त्यामुळे विमानाचे लँडिंग समुद्राच्या पाण्यातच केले. अपघाताच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी ३४ किलोमीटरपर्यंत नोंदवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय हवामान सेवेने दिली आहे.

हेही पाहा- एका तरुणासाठी भिडल्या दोघी, रागारागात एका मुलीने दुसरीच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा VIDEO व्हायरल

दरम्यान, या अपघातानंतर विमानातील लोकं पोहत बाहेर आले यावेळी त्यांना बचाव कार्यासाठी बोटीतून आलेल्या लोकांनी सुरक्षित स्थळी नेलं. तर नौदलाच्या प्रवक्त्याने एनबीसी न्यूजला या घटनेबाबतची माहिती दिली. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सावधगिरीचे उपाय करण्यात आले होते. तसेच अपघाताचे नेमके कारण काय याबाबतचा तपास सुरु आहे. हे अपघातग्रस्त विमान सागरी मातृभूमी संरक्षण अभियानासाठी हवाई येथे तैनात करण्यात आले होते. या विमान अपघाताचा तेथील पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. विशेषत: विमानातून तेल गळती आणि इतर दूषित पदार्थांचा धोका उद्भवण्याची त्यांना भीती वाटत आहे.

जवळपास २७५ दशलक्ष डॉलर किमतीचे Poseidon 8-A हे एक अष्टपैलू विमान आहे, ज्याचा विविध महत्वाच्या कामांसाठी वापर केला जातो. यामध्ये गुप्त माहिती गोळा करणे, नौदल युद्धाभ्यास, पाणबुडीआणि पृष्ठभागावरील दोन्ही युद्धांसाठी त्याचा वापर केला जातो. तसेच या विमानात मोठी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता देखील आहे. विमानाता अपघाच झाल्याचा व्हिडीओ @KanekoaTheGreat नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विमान समुद्राच्या पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे. तर इतर काही लोक बोटीतून त्या विमानाची पाहणी करताना दिसत आहेत. दरम्यान, या अपघातग्रस्त विमानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The plane entered the sea during landing the video of the passengers swimming in the water to save their lives went viral jap
Show comments