आकाशात उडण्याचे स्वप्न अनेकांचे असते, शिवाय लहानपणी प्रत्येकाला आपणालाही पंख असावे आणि आपण पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडावे असे वाटते. तर कधी कधी ट्रफिकला कंटाळलेल्या लोकांनाही सायकल किंवा बाईकला पंख लावावे आणि हवेतून प्रवास करावा, असा विचार मनात येतो. पण लोकं अशा फक्त कल्पनाच करतात. पण सध्या अशा एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कारण या व्यक्तीने चक्क असं विमान बनवले आहे, जे सायकलप्रमाणे पॅडल मारल्यानंतर हवेत उडत आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते पण याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.
हवेत उडणारी सायकल –
Massimo नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती या अनोख्या विमानात बसल्याचं दिसत आहे, जी सायकलप्रमाणे पॅडल मारल्यानंतर ते विमान हवेत उडत आहे. या विमानाला दोन्ही बाजूंना मोठे पंखे लावण्यात आले आहेत. तर मागे एक मोठा पंखा फिरताना दिसत आहे आणि मध्यभागी एक व्यक्ती सेफ्टी बेल्ट लावून बसली आहे, जी सतत पॅडल मारताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “फुशा सकाई यांनी ही उडणारी सायकल तयार केली आहे, हे मानवी शक्तीने चालणारे विमान आहे.”
हेही पाहा- ट्रॅक्टर आणि बस चालक हायवेवर एकमेकांशी भिडले, वाहनांवर उभे राहून हाणामारी केल्याचा VIDEO व्हायरल
या अनोख्या विमानाचा व्हिडिओ ८ नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता, जो आतापासून २.५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर २६ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. तर अनेक लोकांनी या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या आहेत. काही लोकांनी या अनोख्या जुगाडाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी पॅडल चालवताना थकवा आल्यास, पुढे काय होईल अशी चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हा शोध चांगला लावला आहे, पण यासाठी पाय चांगल असले पाहिजेत, पायांना थकवा आला तर मोठी दुर्घटना घडू शकते.”