सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपल्याला हसू आवरणं कठीण होतं तर काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर शहारा येतो, तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊ शकतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हो कारण अनेक जंगली प्राण्यांनी अन्य प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडीओ यापूर्वी तुम्ही पाहिले असतील, किंवा सापाने बेडूक किंवा मोठ्या अजगराने बकरी गिळल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. जे पाहून अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक भलामोठा अजगर दुसऱ्या एका अजगराला गिळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एका अजगराने दुसऱ्या एका अजगराला अर्धवट गिळल्याचं दिसत आहे. दोघांची तोंडं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा- वाढदिवस साजरा करायला गार्डनमध्ये गेली अन् लखपती झाली; ७ वर्षाच्या मुलीला सापडलं असं काही की क्षणात पालटलं नशीब

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या थरारक व्हिडिओमध्ये दोन अजगरांमधील हृदयद्रावक सामना दिसत आहे. शक्तीच्या जोरावर एक मोठा अजगर दुसऱ्या दुसऱ्या अजगरला गिळताना दिसत असून त्याच्या मोठ्या जबड्यात अजगर अडकल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ जितका भयानक तितकाच नेटकऱ्यांना आश्चर्यकाचकित करणारा आहे. शिवाय अनेकांना तर हा व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

हा थरारक व्हिडीओ असला तरीही नेटकरी तो मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. चार दिवसांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ४१ हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने निसर्गाच्या क्रूरतेचे हे भयानक वास्तर असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “हे खरोखरच त्रासदायक आहे.” असं लिहिलं आहे. तिसऱ्याने लिहिलं “मी जे पाहत आहे त्यावर माझा विश्वास बसत नाही!” तर एका युजरने, तुमच्या लक्षात आले नाही मात्र या अजगराला खूप भूक लागली असावी असं कमेंटमध्ये लिहिलं आहे.