आई आपल्या मुलांसाठी आपला जीव पणाला लावते. मुलांसाठी मोठी जोखीम पत्करायलाही मागेपुढे पाहत नाही. हे फक्त माणसामध्येचं नाही तर प्राण्यांचेही असेचं असते. जिथे लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न येतो, मग तो माणूस असो वा प्राणी, प्रत्येकजण त्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. असाच काहीसा प्रकार दिसला जेव्हा एक धोकादायक साप सशावर बाळाच्या हल्ला करण्यासाठी पोहोचला. जीवाची पर्वा न करता सशाची आई त्या धोकादायक सापाशी भिडली. यानंतर दोघांमध्ये जोरदार संघर्ष दिसला. ससा आणि सापाच्या भांडणाचा हा भितीदायक व्हिडीओ खूप जुना आहे, मात्र आता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ससा विषारी सापाशी भिडला
व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, एक ससा एका सापाशी भिडला आहे. दोघांमध्ये जोरदार भांडण झालेलं दिसून येत. सशाने सापाला पछाडले, त्यामुळे साप पळू लागतो, पण ससा त्याच्या मागे लागतो. तो पुन्हा सापाजवळ पोहोचतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर साप त्याच्यावर प्रत्युत्तर देतो आणि यावेळी सापाचा हल्ला धोकादायक असतो.
(हे ही वाचा: Viral Video: …आणि त्याने काही सेकंदात घर तयार केलं; बांधकामाची ‘ही’ पद्धत पाहून व्हाल थक्क!)
आणि सापाने सशावर केला हल्ला…
साप सशावर नंतर फार जोरात हल्ला करतो. साप आणि सशाची अशी भीषण झुंज पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
(हे ही वाचा: Viral: …आणि ६० वर्षांचा मजूर झाला मॉडेल; सगळी फोटोग्राफरची कृपा)
(हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला साप तुम्ही शोधू शकता का? जुनी पोस्ट Viral)
हा व्हिडीओ खूप जुना आहे. मात्र, तो आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.