सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. कोणता ना कोणता व्हिडिओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ म्हटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विषय असतो. एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर आला रे आला की लगेचच वेगाने व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत कासव पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. अर्थात ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. लहानपणी ऐकलेल्या वाचलेल्या ससा आणि कासवाची गोष्ट सत्यात उतरली आहे. यावेळी तरी ससा जिंकेल असं वाटलं होतं. मात्र जे व्हायचं तेच झालं पुन्हा एकदा ससा आळशीपणामुळे हरला.
व्हायर व्हिडिओत ससा आणि कासवाला वेगवेगळ्या ट्रॅकवर ठेवलं आहे. शिटी वाजल्यानंतर शर्यत सुरु होते. पहिल्यांदा ससा वेगाने पुढे जातो. मात्र कासव आपल्या धीम्या गतीने पुढे पुढे सरकताना दिसतो. ससाने इतिहासातून कोणताच धडा घेतलेल्या दिसत नाही. वेगाने पुढे जात एका ठिकाणी थांबतो. मग आपण वाचलेल्या गोष्टीप्रमाणे घडतं. कासव शर्यत जिंकतो आणि ससा हरतो.
ससा आणि कासवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षावर सुरु आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘सात्यत ठेवलं की जिंकतो हे कासवाने दाखवून दिलं आहे’. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘मला वाटलं की आता तरी ससा जिंकेल, पण गोष्ट लिहिण्याऱ्याला याबाबत माहिती आहे.’