अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाली की शेतकऱ्यांना खूप आनंद होतोच, शिवाय नोकरदार वर्ग असो वा शाळेत जाणारे विद्यार्थी, मग तेगावातील असो वा शहरातील सगळ्यांनाच पावसाचं एक वेगळं आकर्षण असतं. त्यामुळे प्रत्येकाला पहिल्या पावसात मनसोक्त भिजावं असं वाटतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपण पाहात असतो, ज्यामध्ये लोक पहिल्या पावसाचा आनंद लुटत असतात. पण या पावसात अंगाला साबण लावून कोणी भरधाव बाईकवर अंघोळ केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? नसेल तर तुम्हाला आज ते देखील पाहायला मिळणार आहे. हो कारण सध्या दोन तरुणाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते पावसात चक्क बाईकवर अंघोळ करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण बाईकवरून जाताना दिसत आहेत. यावेळी दोघांनीही शर्ट घातलेला नाही, उघड्या अंगाने ते बाईकवरुन जाताना दिसत आहेत. पावसात हे दोघे धावत्या बाईकवर अंघोळ करताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या दोघांनी यावेळी अंगाला साबण लावल्याचंही दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांसह व्हिडीओ पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- आनंद महिंद्रांनाही पडली मुंबईच्या पावसाची भुरळ, चिमुकल्याचा ‘तो’ मनमोहक Video शेअर करत म्हणाले, “प्रत्येक भारतीयाच्या…”

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ –

तरुणांचा भरधाव बाईकवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी यालाच वेळेचा सदुपयोग करणं म्हणतात, अशा कमेंट केल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या बाईकवरील नंबरवरुन ती कानपूरची असल्याचं सांगितलं जात आहे. तरुणांचा हा भन्नाट व्हिडिओ @Viralbhaiya नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- हवेत उडणाऱ्या खुर्च्या, धरपडणारी माणसं अन्…, समुद्री वादळात अडकलं जहाज, थरारक घटनेचा Video व्हायरल

विक्रम नावाच्या नेटकऱ्याने लिहिलं, “कदाचिक यांच्या घरात पाणी आले नसेल त्यामुळे.” तर आणखी एकाने लिहिले की, पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला जात आहे, त्यात गैर काय? पण ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे चलन कापलं जाणार हे नक्की. तर काही नेटकऱ्यांनी यांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रील बनवल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मुलांच्या या अनोख्या कृतीचं कौतुकदेखील केलं आहे.