Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी लहान मुलांचे तर कधी वृद्धांचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी रिक्षावरील पाट्या तर कधी बसमधील घटना चर्चेत येतात. कधी जुगाडचे तर काही दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणारे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही थक्क करणारे असतात. काही खळखळून हसवणारे व्हिडीओत असतात तर काही भावुक करणारे व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका रिक्षाचालकाच्या शर्टवर त्याच्या मुलीने लिहिलेला सुंदर मेसेज दिसत आहे. या रिक्षाचालकाच्या मुलीने काय लिहिलेय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रिक्षाचालक दिसेल. तो रिक्षा चालवत आहे आणि त्याच्या शर्टावर एक सुंदर मेसेज लिहिला आहे. हा मेसेज वाचून कोणालाही कळेल की तो त्याच्या मुलीने त्याच्यासाठी लिहिलाय. त्याच्या शर्टावर लिहिलेय, “आय लव्ह माय डॅड” (माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे) हा मेसेज वाचून कोणीही भावुक होईल. विशेष म्हणजे रिक्षाचालकाने मुलीचा हा सुंदर मेसेज लिहिलेला शर्ट कौतुकाने घातला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “मला खूप आवडले की त्याने खूप अभिमानाने लेकीने त्याच्यासाठी तयार केलेला शर्ट घातला आहे. ही आयुष्यातील खूप लहान गोष्ट आहे पण खूप जास्त महत्त्वाची असते.”
तुम्ही रिक्षावर लिहिलेले अनेक मेसेज वाचले असेल पण चक्क रिक्षाचालकाच्या शर्टवर लिहिलेला हा मेसेज सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
vaarunii_sreedhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी याचा साक्षीदार होतो, याचा मला आनंद आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे खरं प्रेम आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही सर्वात गोंडस गोष्ट मी आज पाहिलेली” आणखी एका युजरने लिहिलेय, “सर्वात श्रीमंत माणूस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी वडिल आणि मुलीच्या सुंदर नात्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.