सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणाला सतत वेगवेगळे आणि विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून आपलं मनोरंजन होत असतं. शिवाय अनेक लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वेगवेगळे आणि विचित्र स्टंट करत असतात. कधीकधी असे स्टंट त्यांच्या अंगलट आल्याचंही आपण पाहिलं आहे. सध्या अशाच एका रिक्षाचालकाने केलेला स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हा रिक्षालकच विचित्र पद्धतीने रिक्षा चालवतानाचा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावार शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

हेही पाहा- चहा करण्यासाठी गॅस सुरु केला अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं; भीषण स्फोटाचा Video होतोय व्हायरल

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अशा रिक्षांमध्ये बसताना तुम्ही नक्कीच विचार कराल यात शंका नाही. व्हिडीओमध्ये एका रिक्षाचालकाने रस्त्यावर धावणाऱ्या इतर वाहनांसोबत रेस लावल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी तो रिक्षा चक्क हवेत चालवत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो इतक्या वेगात रिक्षा चालवतो की, रिक्षा पलटी होते की काय असा भास व्हिडीओ पाहताना होत आहे.

दोन चाकांवर पळवली रिक्षा –

हेही पाहा- Video: नदीच्या पाण्यात तोंड धुवत होती तरुणी, त्यानंतर जे घडलं…; तरुणीच्या कायम लक्षात राहील ‘हा’ क्षण

हा व्हायरल व्हिडिओ butterfly__mahi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक रिक्षाचालक रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडीओत रिक्षाचालक सुरुवातीला भरधाव वेगाने रिक्षा पळवतो तर काही वेळाने तो चक्क दोन चाकांवरच रिक्षा पळवताना दिसत आहे.

दरम्यान, रस्त्यावर दोन चाकांवर धावणारी रिक्षा पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. शिवाय रिक्षाचालकाचा रिक्षा पळवण्याचा अनोखा अंदाज नेटकऱ्यांना आवडल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओला आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ५ हजाराहून अधिक यूजर्सनी तो लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ड्रायव्हर वेडा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा थरारक व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader