हॉटेल, शाळा, एटीएम, बँक इत्यादी ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने रक्षक तैनात केले जातात. त्या जागेचे आणि तेथील प्रत्येक गोष्टीचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. कोणी चोर आणि दरोडेखोर त्या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आला, तर त्याला ते जीव धोक्यात घालून सामोरे जातात. सोशल मीडियावर अशाच एका शूर सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांनी सुरक्षा रक्षकाच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक सुरक्षा रक्षक एका बँकेच्या गेटमधून बाहेर पडतो आणि तो गेट बंद करून पटकन शटर बंद करण्याचा प्रयत्न करतो. खूप प्रयत्न करूनही शटर बंद होत नाही. कारण- त्यावेळी बँकेच्या आत शिरलेले दरोडेखोर शटर उचलण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी शटर उघडण्यात ते यशस्वी होतात आणि थेट सुरक्षा रक्षकाच्या दिशेने गोळी चालवतात. यावेळी न घाबरता एकटा सुरक्षा रक्षक दोन दरोडेखोरांचा सामना करतो आणि तोही त्यांच्यावर गोळीबार करतो. यावेळी घाबरुन दरोडेखोर स्वत:च शटर पुन्हा बंद करतात. इतक्यात सुरक्षा रक्षक बँकेबाहेरील पायऱ्या खाली उतरतो आणि मुख्य दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे साहजिकपणे दरोडेखोर आतच अडकतात.

एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) @gharkekalesh नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सुरक्षा रक्षक सरदारजी खूप शूर आहेत. तुम्हाला सलाम! आणखी एका युजरने लिहिले की, सिंग इज किंग. तिसऱ्या युजरने लिहिले की, व्हिडीओ पाहिल्यानंतर मी घाबरले. आणखी एका युजरने लिहिले की, सरदारजींना सलाम!