नवी दिल्ली : २०१८ मध्ये अभिनेता सलमान खानने एक ‘रेस’ लावली होती. चित्रपटगृहात या रेसने पैसा वसुल केला. मात्र, बॉक्सआॅफिसवर चित्रपट जोरदार पडला. याच वर्षी आणखी रेस पाहायला मिळाली. पण ही रेस चित्रपटगृहाच्या पडद्यावरील नसून खेळाच्या मैदानातील आहे. जगातील सर्वात तंदुरूस्त क्रिकेटपटू असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व सर रविंद्र जडेजा यांच्यामध्ये ही रेस झाली होती. मैदानावर झालेल्या दोघांमधील रेसचा व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीसीसीआयने आपल्या अधिकृत टिविट्र खात्यावरून कोहली आणि जडेजाच्या रेसचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कोहली आणि जडेजा दोघेही सीमारेषेच्या दिशेने जाणारा वेगवान चेंड रोखण्यासाठी धावताना दिसत आहेत. २०१८ च्या आठवणींना उजळा देत बीसीसीआयने हा व्हिडिओ टाकला आहे. दोन्ही खेळांडूमधील ही रेस आॅक्टोबरमध्ये वेस्टइंडीजविरूद्घ झालेल्या एकदिवसीय सामन्यातील आहे. सर्वाधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

एकदिवसीय श्रृखंलेतील चौथ्या सामन्यात दोन्ही खेळांडूमध्ये ही रेस पाहायला मिळाली होती. २९ आॅक्टोबर २०१८ रोजी हा सामना झाला होता. या सामन्यात अनेक रोमहर्षक क्षण पाहायला मिळाले. यापैकी एक क्षण म्हणजे कोहली आणि जडेजामध्ये चौकार वाचविण्यासाठी लागलेली ‘रेस’ होय. भुवनेश्वर कुमारच्या चौथ्या चेंडूवर वेस्टइंडीच्या चंद्रपाल हेमराजने जोरदार फटका मारला होता. सीमारेषेच्या दिशेने जाणारा हा चेंड रोखण्यासाठी कोहली व जडेजा सोबत धावत होते. दोघांमध्ये जणू धावण्याची शर्यत लागल्याचे त्यांच्याकडे पाहताना वाटत होते. पण कोहलीच्या पूर्वी जडेजाने मैदानावर घसरत जात चेंडू ताब्यात घेवून कोहलीकडे फेकला. यानंतर कोहलीने चेंडू धोनीच्या दिशेने भिरकावला. या सामन्यात वेस्टइंडीजचा २२४ धावांनी पराभव झाला होता. भारताने प्रथमच फलंदाजी करताना ५० षटकात ३७७ धावा कुटल्या होत्या. हिटमॅन रोहित शर्मा व अंबाती रायुडू या दोघांनी दमदार शतक झळकावले होते.