जगातील सगळ्यात उंच टॉवरच्या यादीत शंघायमधल्या ‘शंघाय टॉवर’ दुस-या क्रमांकावर आहे. चीनमधल्या शंघाय प्रजासत्ताकमधील ही सगळ्यात मोठी गगनचुंबी इमारत आहे. त्यामुळे या इमारतीच्या नावावर विश्वविक्रम आहेच. पण, आता या इमारतीच्या नावावर तीन ‘गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील जमा झाले आहेत.
वाचा : ..म्हणून पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक केली मोफत
शंघाय टॉवर ही जगातील दुस-या क्रमांकाची उंच इमारत आहे. या इमारतीची उंची २ हजार ७४ फूट आहे. आता या इमारतीच्या नावावर तीन विश्वविक्रमाचा समावेश झाला आहे. अधिक वेगाने वर जाणारी उद्वाहन यंत्रणा या इमारतीत आहे. त्यामुळे हा विश्वविक्रम शंघाय टॉवरच्या नावावर झाला आहे. त्याचप्रमाणे उंच उद्वाहन यंत्र आणि वेगात वर जाणरे डबल डेक असणारे उद्वाहन यंत्र असे आणखी दोन विश्वविक्रम या टॉवरच्या नावे जमा झाले आहेत. जुलै महिन्यात i’Mitsubishi Electric कंपनीचे उद्वाहन यंत्र या इमारतीत बसवण्यात आले होते. हे नवीन यंत्र प्रतिसेंकदाला ६८ फूट एवढे अंतर कापते अशी माहिती ‘सीएएन’ने दिली आहे. हा वेग उसेन बोल्ट किंवा चित्ता प्राण्याच्या वेगापेक्षाही अधिक आहे.
वाचा : स्वीडनमध्ये बनवले बर्फापासून हॉटेल
शंघाय टॉवरचे बांधकाम हे २९ नोव्हेंबर २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ही चीनमधील सर्वात उंच इमारत आहे. तर जगातील दुस-या क्रमांकाची मोठी इमारत आहे. जगातील सर्वात उंच इमारतीचा मान दुबईमधल्या ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीला जातो.