आरशात पाहणे ही आपल्यासाठी अगदीच सामान्य गोष्ट आहे. सणावाराच्या दिवसांत तर आपण कितीतरी वेळ आरशासमोरच असतो. आवरुन झाले तरी आरशासमोर रेंगाळायला अनेकांना आवडते. मग तो आरसा कपाटाचा असो किंवा अगदी लिफ्टमधला. आपण त्यामध्ये स्वत:ची छबी पाहण्याची एकही संधी सोडत नाही. आता हे झाले आपल्याबद्दल पण लहान मुलांना आरसा काय असतो हे माहित नसते, त्यामुळे आपली छबी ते जेव्हा पहिल्यांदा आरशात पाहतात तेव्हा हे बाळ कोण आहे असं वाटून ते आपल्याच प्रतिमेला हात लावण्याचा, त्याची पापी घेतात, तर कधी चक्क मारण्याचाही प्रयत्न करतात. ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेली असते. लहान मुलं ज्याप्रमाणे आरशात पाहिल्यावर करतात त्याच पद्धतीने काही वेळा प्राणीही स्वत:ला आरशात पाहून करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक मेंढी रस्त्यावर फिरत आहे. ती फिरत फिरत एका गेटपाशी येते. तिथे चमकदार काचेत स्वतःला पाहून तिला वाटतं की तिच्या समोरही एक मेंढी आहे. त्यामुळे ती जोरात येऊन काचेला धडक देते. तरीही तिला समजत नाही आणि ती परत मेंढीला धडक देते म्हणून काचेवर शिंग मारते. हा व्हिडीओ पाहून हसू अनावर होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: दबक्या पावलांनी आला..बछड्याने केलं असं काही की चक्क सिंहच दचकला

हा व्हिडिओ काही दिवसांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोक तो पाहण्याची मजा घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sheep attacked by looking at itself in the mirror srk