अनेक शर्टच्या मागच्या बाजूला एक छोटीशी अर्धवर्तुळाकार दुमडलेली पट्टी असते. या पट्टीचा नक्की काय उपयोग होत असेल बरं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कदाचित शोभेसाठी ही पट्टी तिथे लावली असेल, असे तुमच्याही मनात आले असेल. पण ही पट्टी लावण्यामागे कारण वेगळे आहे.

वाचा : जीन्सला हा छोटा कप्पा का असतो माहितीये?

अनेक शर्टच्या मागच्या बाजूला ही पट्टी असते. ही पट्टी जरी आता शोभेसाठी लावली जात असली तरी तिचा उपयोग आधी शर्ट अडकवण्यासाठी केला जायचा. त्यावेळी कपडे ठेवण्यासाठी वेगळे कपाट किंवा हँगर नव्हते. त्यामुळे शर्ट खुंटीला अडकवण्यासाठी ही पट्टी लावण्यात आली होती. याचा उपयोग करून शर्ट खिळ्याला सहज अडकवता यायचे. तसेच शर्टला चुण्याही पडायच्या नाही. पण हळूहळू कपाट, हँगर आले त्यामुळे शर्ट ठेवायला वेगळी जागा तयार झाली. जर शर्टला चुण्या पडल्या तर  इस्त्री करून या चुण्या घालवताही येतात. पण तेव्हा अशी सोय नव्हती. म्हणून शर्ट अडकवण्यासाठी ही पट्टी देण्यात आली. अनेक कंपन्यांनी आपल्या शर्टच्या मागे अशा प्रकारच्या पट्ट्या लावल्या  होत्या. या पट्टीचा आता आपल्याला काहीच उपयोग नसला तरी कंपन्यांनी शर्ट शिवताना मात्र या पट्ट्या आवर्जून लावतात.

 

 

Story img Loader